टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रासह 12 खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी (13 नोव्हेंबर) खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत राजभवनात यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कारप्राप्त खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह,
पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांचादेखील समावेश आहे.
याशिवाय, क्रिकेटपटू शिखर धवन, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यतिराज, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं.