चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांचा पराभव करून कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले. या जोडीचे यंदाचे हे तिसरे विजेतेपद आहे. या विजेतेपदापूर्वी सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीतील पुरुष दुहेरी जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर, भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन करत अव्वल मानांकित फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांचा पराभव केला.
ही जोडी पहिल्या गेम मध्ये पराभूत झाली होती.पण जोरदार पुनरागमन करत आणखी एक विजेतेपदाची नोंद केली. जूनमध्ये इंडोनेशिया ओपन ही शेवटची स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय जोडीने सलग दुसरे विजेतेपद पटकावले.
जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम फेरीत दोनवेळच्या जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या अल्फियान आणि आर्डियंटोवर 17-21, 21-13, 21-14 असा विजय मिळवला. 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन सात्विक आणि चिराग यांचा हा सलग 10वा विजय होता. या वर्षी स्विस ओपन, आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडोनेशिया ओपनमध्ये विजय मिळवल्यानंतर भारती जोडीने त्यांच्या किटीमध्ये आणखी एक विजेतेपदाची भर घातली.
भारतीय जोडीने भारताविरुद्ध एकूण चार सामने खेळले होते आणि विक्रम 2-2 असा बरोबरीत होता. मात्र, याआधीचे दोन्ही सामने भारतीय जोडीने जिंकले असून आत्मविश्वास त्यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा घेत भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन केले. सलामीचा गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने उर्वरित दोन गेम जिंकून सामन्यावर शिक्कामोर्तब केले.