Dharma Sangrah

Lionel Messi: सेलिब्रेशन दरम्यान लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ थोडक्यात बचावला

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2022 (10:31 IST)
FIFA विश्वचषक 2022 जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ आपल्या देशात परतला आहे. येथे टीमचे खेळाडू 36 वर्षांनंतर सर्व देशवासीय आणि फुटबॉल चाहत्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत आहेत. यादरम्यान अर्जेंटिनाचा संघ बसमध्ये ट्रॉफी घेऊन चाहत्यांसोबत रॅलीत सामील झाला. या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आणि मेस्सीसह पाच खेळाडू बचावले. 
 
अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीमध्ये सामील झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते. त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले. अखेरच्या क्षणी सर्व खेळाडू खाली वाकले आणि बस विजेच्या तारेखाली गेली. या तारेमुळे खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याचा धोका जरी न्हवता, मात्र तारेवर आदळल्याने हे खेळाडू बसमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजपमध्ये मोठी बंडखोरी! महापालिका निवडणुकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी सामूहिक राजीनामे दिले

एका अधिकाऱ्याने स्वतःच्या बँकेतून 1 कोटी 58 लाख रुपये लुटले, ऑनलाइन गेमिंगद्वारे पैसे गमावले होते

बिहार मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी

शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधून बाहेर

धक्कादायक! लोकल ट्रेनमध्ये मराठी न बोलल्यामुळे मारहाण; मानसिक तणावात महाविद्यालयीन विद्यार्थीची आत्महत्या

पुढील लेख
Show comments