Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॅरेडोनाला या प्रकारे श्रद्धांजली दिल्यामुळे मेस्सीला दंड

Lionel Messi fined 600 euros for tribute to Maradona
, शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (12:41 IST)
महान फुटबॉलपटू मॅरेडोना यांचे निधन झाल्याने जगभरातील फुटबॉलपटू आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतू स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने स्पॅनिश लीग स्पर्धेतील सामन्यात डिएगो मॅरडोनाला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. पण ती त्याला महागात पडली कारण त्याला तब्बल ६०० युरो (जवळपास ५३ हजार रुपये) चा दंड झाला आहे. 
 
बार्सिलोनाचा स्टार मेस्सीने ओसासुनाविरुद्धच्या सामन्यात स्वत:ची जर्सी काढली. त्याने गोल केल्यानंतर बार्सिलोनाची जर्सी काढून मॅरेडोनांच्या जुन्या क्लब नेवेल्स ओल्ड बॉयजची जर्सी घातली. पण सामना झाल्यानंतर स्पॅनिश फुटबॉल महासंघाच्या प्रतिस्पर्धी समितीने मेस्सीला दंड केला. समीतीने फक्त मेस्सीला नाही तर बार्सिलोनाला देखील १८० युरोचा दंड केला. त्याच बरोबर मेस्सीला यलो कार्ड देखील दाखवण्यात आले. या सामन्यात बार्सिलोनाने ४-० असा विजय मिळवला. 
 
मेस्सीने मॅरेडोना यांच्या निधनानंतर त्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करून देखील श्रद्धांजली वाहिली होती. तसेच स्पॅनिश लीग स्पर्धेतील सामना झाल्यानंतर मेस्सीने मॅरेडोनाचा फोटो शेअर करत फेअरवेल डिएगो, असा मेसेज शेअर केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्दिक पांड्यानं शेअर केला विराटसोबतचा फोटो व्हायरल