Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिओनेल मेस्सीने विक्रमी सातव्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला

Lionel Messi wins Ballon d'Or for record seventh timeलिओनेल मेस्सीने विक्रमी सातव्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला Marathi Sports News Sports News In Marathi   Webdunia Marathi
, बुधवार, 1 डिसेंबर 2021 (18:45 IST)
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने विक्रमी सातव्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्कार पटकावला, याला खेळातील सर्वात मोठा पुरस्कार म्हटले जाते. मेस्सीची लढत रॉबर्ट लेवांडोस्की आणि जोर्गिनोविरुद्ध होती. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे. मेस्सी म्हणाले  की, जेव्हा मी गेल्या वेळी हा पुरस्कार जिंकला तेव्हा मला वाटले की ही शेवटची वेळ आहे. मेस्सी नुकतेच बार्सिलोनातून पॅरिस सेंट जर्मेन (PSG) फुटबॉल क्लबमध्ये गेले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये अर्जेंटिनाला कोपा अमेरिका जिंकण्यात मेस्सीने मोलाची भूमिका बजावली होती.
रॉबर्ट लेवांडोव्स्कीला सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून गौरवण्यात आले असून बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकल्याबद्दल मेस्सीचे अभिनंदन केले आहे. मेस्सी म्हणाले , 'पुन्हा येथे येऊन खूप छान वाटत आहे. दोन वर्षांपूर्वी मला वाटले की ही माझी शेवटची संधी आहे. कोपा अमेरिका जिंकणे महत्त्वाचे होते. मेस्सीचे 613 गुण होते, तर लेवांडोव्स्कीचे 580 गुण होते. जोर्गिनोच्या खात्यात केवळ 460 गुण आले. अॅलेक्सिया पेटुलासला महिलांचा बॅलोन डी'ओर किताब देण्यात आला.
या पुरस्काराच्या शर्यतीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो टॉप-3 मध्ये नसण्याची गेल्या 10 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. बॅलोन डी'ओर रँकिंगमध्ये ते सहाव्या स्थानावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, ड्रोनद्वारे मेघालयाच्या दुर्गम भागात औषध पोहोचले