भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने शनिवारी येथे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत चेक प्रजासत्ताकच्या तिसऱ्या मानांकित डॅलिबोर स्विरसिनाचा सरळ सेटमध्ये पराभव केला.
द्वितीय मानांकित नागलने जवळपास दोन तास चाललेल्या सामन्यात 21 वर्षीय चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूचा 6-3, 6-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याचा सामना अव्वल मानांकित इटलीच्या लुका नार्डीशी होणार आहे.
वीस वर्षीय नार्डीने तीन तास चाललेल्या मॅरेथॉन लढतीत चायनीज तैपेईच्या बिगरमानांकित चुन सिएन त्सेंगचा 6-4, 4-6, 7-6 (6)असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी ऋत्विक बोल्लीपल्ली आणि निक्की पूनाचा यांचा 3-6, 6-3, 10-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.