नाशिकच्या दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात टी 47 श्रेणीतील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे दिलीप आगामी 2024 च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असून त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.
चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशिनय पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा अॅथलिट्सनी इतिहास रचला. यातील दिलीप गावीत या तरूणानेही सुवर्णपदक जिंकले आहे. दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात 400 मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्याला क्रीडा प्रशिक्षक आनंद काळे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान दिलीप हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील खेळाडू आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor