Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भालाफेक: भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदक पटकावले

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (17:48 IST)
ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच भारताने अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकले आहे आणि तेही सुवर्णपदक.
 
जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या ऑलिंपिक खेळांच्या 15 व्या दिवशी नीरज चोप्रा आणि बजरंग पुनिया यांनी चमत्कार केले आहेत. नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण जिंकून अॅथलेटिक्समध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. 

नीरजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 गुण मिळवले आहेत आणि प्रथम क्रमांकावर आहे.
 
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७ मिटर लांब भाला फेकला. नीरजचा चौथा आणि पाचवा प्रयत्न फाऊल झाला.
 
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे एथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये एथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
 
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५vमेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: राहुल गांधींचा 5 लाखांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप

नंदुरबारमध्ये राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसने आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला

'तुमचा डिस्क्लेमर ट्रम्पच्या बातमीच्या खाली...', SC न्यायाधीशांनी NCP चिन्हाच्या वादावर केली टीका

Eknath Shinde Profile एकनाथ शिंदे प्रोफाइल

Ajit Pawar Profile अजित पवार प्रोफाइल

पुढील लेख
Show comments