निषाद कुमारने रविवारी-सोमवारच्या मध्यरात्री उंच उडी T47 स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकले. मात्र, निषादनेही सुवर्णपदक गमावल्याची खंत व्यक्त केली. या उंच उडी T47 स्पर्धेत अमेरिकन खेळाडूला सुवर्णपदक मिळाले. अमेरिकेच्या टाऊनसेंड रॉड्रिकने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. निषाद कुमारने उंच उडी T47 स्पर्धेतपॅरिसमध्ये हंगामातील सर्वोत्तम उडी मारली.
सलग दोन पॅरालिम्पिक पदके जिंकणारा सर्वात तरुण भारतीय होण्याचा मान निषादला मिळाला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून निषादने खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण ठेवले. त्याने अमेरिकन खेळाडूचे त्याच्या सुवर्ण यशाबद्दल खुलेआम अभिनंदन केले. जवळच्या स्पर्धेत निषादने दुसरे स्थान पटकावले.
२४ वर्षीय निषाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला सातवे पदक मिळवून दिले. भारतासाठी रौप्य पदक जिंकल्यानंतर निषाद क्रीडा मंचावर वाकताना दिसला.