Dharma Sangrah

'हाय वोल्टेज' सामन्यात सिंधूने दिली सायनाला मात

Webdunia
शनिवार, 1 एप्रिल 2017 (11:45 IST)
इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या ‘हायव्होल्टेज’ सामन्यात आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालला सरळ दोन गेममध्ये धक्का दिला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले.
 
सिंधूने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य ठेवताना दमदार खेळ करताना सायनाचे तगडे आव्हान २१-१६, २२-२० असे परतावले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी सिंधूला झुंजवले. यावेळी सायना बरोबरी साधणार असेच चित्र होते; परंतु दुसरा गेम २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सलग दोन गुण वसूल करीत सामन्यावर कब्जा केला.
 
विशेष म्हणजे, याआधी सायना आणि सिंधू कारकिर्दीत केवळ एकदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी सायनाने सरळ गेममध्ये बाजी मारली होती. यावेळी सिंधूने सरळ गेममध्ये विजय मिळविला. त्याचप्रमाणे, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेतही सिंधूने सायनाला नमविले होते. तसेच, २०१३ सालच्या लीगमध्ये सायनाने सिंधूविरुद्ध बाजी मारली होती.
 
याआधी झालेल्या सामन्यात स्पर्धेतील द्वितीय मानांकित कोरियाच्या सुंग जी ह्यून हिने शानदार विजय नोंदविताना गतविजेत्या आणि पाचवी मानांकित रत्चानोक इंतानोनला २१-१६, २२-२० असे नमविले. तसेच, चौथ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीने माजी आॅल इंग्लंड विजेत्या नोजोमी ओकुहाराला २१-१३, ११-२१, २१-१८ असा धक्का दिला.
 
पुरुषांमध्ये दोन वेळच्या उपविजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनने विजयी घोडदौड कायम राखताना चिनी तैपईच्या जू वेई वांगचे आव्हान १९-२१, २१-१४, २१-१६ असे परतावले. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

IRCTC ची नवीन वेबसाईट उद्या सुरू होणार, जाणून घ्या तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये कोणते बदल होणार

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १५ दिवसांच्या आत फेरनिवडणूक घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला

नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सुधारित पीक विमा योजना सुरू; अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै

Supplementary Result 2026: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार

येवला-नांदगाव महामार्गावर लक्झरी बस उलटली; अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments