Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेग्नंट सेरेना विल्यम्सचा मॅग्झिनसाठी खास फोटोशूट

pregnant Serena Williams nude photo shoot for magazine
न्यूयॉर्क- 23 वेळा ग्रँडस्लॅम विजेता सेरेना विलियम्स कोर्टापासून लांब असली तरी चर्चेत आहे. या टेनिसस्टारने वॅनिटी फेअर मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी एका वेगळ्या अंदाजात पोझ दिला आणि सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाली आहे. 
 
यात सेरेना आपल्या प्रेग्नंट बॉडीसोबत दिसत आहे. सेरेना आणि तिचा होणारा पती अलेक्सिस ओहेनिअन या दोघांवर या मॅग्झिनमध्ये एक सविस्तर लेख लिहिला आहे.
pregnant Serena Williams nude photo shoot for magazine
या फोटो न्यूड असून तिने केवळ कमरबंद घातल्याचे दिसत आहे. या फोटो स्वत: ट्विटरवर शेअर करत सेरेनाने लिहिले आहे की मला वॅनिटी फेअर कव्हरवर बघा, प्रश्न हा आहे की आपला विचार काय आहे मुलगा की मुलगी. मी जा़णून घेण्यासाठी उत्सुक आहे तरी मला आपले विचारही जाणून प्रसन्नता होईल. या व्यतिरिक्तही सेरेनाचे आणखी फोटो व्हायरल होत आहे. 
 
ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी प्रेग्नंट असल्याचे मला समजले, असे सेरेना म्हणाली व तिने एप्रिलमध्ये यासंबंधी माहिती दिली होती. तसेच वर्षभर कोणत्याही टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. विजेतेपद वाचवण्यासाठी मात्र ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी आपण मैदानात उतरू शकतो, असे तिने म्हटले होते.
 
सेरेना 34 वर्षीय ओहेनिअर हे सोशल मीडिया वेबसाइट रेडिटचे सह सह संस्थापक आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी साखरपुड्याची घोषणा केली होती. प्रेग्नंसीबद्दल माहिती होताच ओहेनिअने फोन करून आपल्याला लवकरात लवकर मेलबर्नला येण्यास सांगितले होते.
 
दरम्यान, मला अजून बरेच खेळायचे असनू माझे ‍करिअर संपले असे मला अजिबात वाटत नाही, असे तिने मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितल आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकार एअर इंडियामधील आपले समभाग विकणार