आशियाई गेम्समध्ये मंगळवारी भारतासाठी एक अजून चांगली बातमी मिळाली. भारताला शूटर सौरभ चौधरीने गोल्ड सुवर्ण पदक दिलवले. देशासाठी सुवर्ण पदक पटकावणारा सौरभचे वय मात्र 16 वर्ष आहे.
सौरभ मेरठच्या कलीना गावाचा रहिवासी आहे. जीतू राय याच्याजागी सौरभला आशियाई खेळासाठी पाठवण्यात आले आहे. 10 मीटर एअर पिस्टलमध्ये सौरभने 586 अंकासह पहिले स्थान पटकावले. भारताचे एक आणखी शूटर अभिषेक वर्माने देखील क्वालीफाय केले आहे. ते 580 अंकासह सहाव्या क्रमांकावर राहिले. अभिषेक वर्माने ब्रांज मॅडेल पटकावले.
सौरभने क्वालिफिकेशन दरम्यान 99, 99, 93, 98, 98, 99 चे शॉट्स लावत 586 स्कोअर केला होता. त्याने तीनदा 99 स्कोअर केला आणि कोरियाच्या जिन जिंगोहला मागे टाकले.
सौरभने या वर्षाच्या सुरुवातीत 10 मीटर एअर पिस्टलमध्ये गोल्ड मॅडेल जिंकून इतिहास रचला होता. त्याने जर्मनीच्या सुसमध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप फायनलमध्ये 243.7 स्कोअर केले होते.
यापूर्वी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटने भारतासाठी गोल्ड मॅडेल जिंकले.