टोकियो ऑलिम्पिकचा 13 वा दिवस जो भारतीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना करेल. बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनची 69 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेन्झ सुरमेनेलीशी लढत होईल.लोव्हलिनाने भारतासाठी यापूर्वीच पदक मिळवले आहे. याशिवाय, भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने चमकदार कामगिरी केली. त्याने भालाफेक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकला.तो त्याच्या गटात प्रथम आला.
नीरज चोप्रा भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत पोहोचला
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात शानदार फेक केली. त्याने भाला 86.65 मीटर दूर फेकला. यासह तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.अंतिम फेरीत थेट प्रवेश करण्यासाठी 83.50 मीटर थ्रो आवश्यक आहे. 7 ऑगस्टला अंतिम सामन्यात नीरज आता आपली ताकद दाखवेल. पुरुष भालाफेक फेरी पात्रता फेरीत नीरज चोप्रा गटात प्रथम आला.