Marathi Biodata Maker

यूएस ओपनचा बाहदशाह नदाल

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:10 IST)
टेनिस कोर्टवर  पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित रफाएल नदालची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्यानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अमेरिकन खुली तिसरी आणि कारकीर्दीतील १६वी ग्रँडस्लॅम ट्रॉफी  नदालने जिंकली.
 
दुखापतीला जिद्दीनं परतावून लावत नदालने यावर्षी कोर्टवर दमदार पुनरागमन केलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो उपविजेता होता, तर फ्रेंच ओपनमध्ये  त्यानं बाजी मारली होती. त्यानंतर अमेरिकेत त्यानं वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं आहे.
 
कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या ३२व्या मानांकित केविन अँडरसनपुढे नदालच सरस  ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत नदालचे पूर्ण वर्चस्व होते. त्याने पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारत सामन्याला  दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही नदालच सरस दिसून आला. तर पीटर अँडरसनने नदालच्या अनुभवासमोर पूर्णपणे गुडघे टेकल्याचे दिसत होते. हा सेटही नदालने 6-3 ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
 
पहिल्या दोन सेट नंतर तिसऱ्या सेटमध्येही नदाल विजेत्याप्रमाणे खेळला. पीटर अँडरसनच्या चुकांचा त्याने अचूक फायदा उचलला. पण शेवटच्या दोन-तीन गेममध्ये अँडरसनने नदालला कडवी टक्कर दिली. शेवटी  हा सेटही 6-4 ने जिंकत नदालने अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपांवर आदेश बांदेकर यांचे सडेतोड प्रत्युत्तर

लोककला बळकट करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आशिष शेलार यांची घोषणा

LIVE: भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी… आदित्य ठाकरेंचा मोठा हल्ला

एफडीएकडून मुंबईतील शाळांमधील कॅन्टीन आणि माध्यान्ह भोजन केंद्रांची तपासणी तीव्र

नंदुरबार समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा ४० मुले आजारी

पुढील लेख
Show comments