Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलंड कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटचे तिसरे सुवर्णपदक

Vinesh Phogat's third gold medal in the Poland Wrestling
नवी दिल्ली , मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (09:16 IST)
भारताची अव्वल दर्जाची खेळाडू विनेश फोगटने पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आणि या मोसमातील तिसऱ्या विजेतेपदाची नोंद केली. ती 53 किलो गटात सहभागी झाली होती.
 
विनेश या 24 वर्षीय खेळाडूने वॉर्सा येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत रूकसाना हिच्यावर 3-2 अशी मात केली. तिने या कुस्तीत उत्कृष्ट डावपेचांचा उपयोग केला. तिने उपांत्यपूर्व फेरीत स्वीडनची रिओ ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती खेळाडू सोफिया मॅटसन हिचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदविला होता. विनेशने या मोसमात स्पेनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा व इस्तंबूलमध्ये झालेली यासर दोगु चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात स्फोट झाल्याने वीज निर्मिती ठप्प