फोटो साभार ट्विटर
युवा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी 15 पदके जिंकली.या मध्येआठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदक भारताच्या खात्यात आले. एवढेच नव्हे तर या चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत भारतीय खेळाडूंनी दोन स्पर्धांमध्ये जागतिक विक्रमही केले.
युवा विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय तिरंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पोलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारतीय खेळाडूंनीही रविवारी रिकर्व्ह फेरीत जबरदस्त कामगिरी करत पाच सुवर्ण आणि तीन कांस्यपदके जिंकली. गेल्या वर्षी 18 वर्षांखालील महिला रिकर्व्ह स्पर्धेची विजेती कोमालिका बारीने 21 वर्षांखालील विजेतेपदही पटकावले.
कोमालिका व्यतिरिक्त, भारताने 21 वर्षांखालील रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. यासह तिने मिश्र स्पर्धेचे सुवर्णपदकही पटकावले. विशाल चांगमाईने 18 वर्षांखालील पुरुष रिकर्व्ह जिंकले तर महिला स्पर्धेत मंजिरी मनोजने कांस्यपदक पटकावले.
अंडर -18 मिश्रित आणि सांघिक स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेता होता. रिकर्व्ह कॅडेट महिला स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 9-15 ऑगस्ट दरम्यान आयोजित युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताने एकूण 15 पदके जिंकली. या मध्ये आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदक भारताच्या खात्यात आले. एवढेच नव्हे तर या चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत भारतीय खेळाडूंनी दोन स्पर्धांमध्ये जागतिक विक्रमही केले.
भारताच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.