भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंड संघाचा 68 धावांनी शानदार पराभव केला.भारतीय संघाने एकूण तिसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. यानंतर इंग्लंडचा संघ अवघ्या 103 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाने सामना जिंकताच विक्रमांची मालिका केली.
टी-20 विश्वचषकातील बाद फेरीतील कोणत्याही संघाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धचा सामना 68 धावांनी जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. T20 विश्वचषकातील बाद फेरीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद करण्याचा विक्रम वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजने टी20 विश्वचषक 2012 च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 74 धावांनी विजय मिळवला.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा हा चौथा सर्वात मोठा विजय आहे. भारताने T20 विश्वचषक 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध 90 धावांनी विजय मिळवला, जो T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.
टी-20 विश्वचषक 2024 मधील भारतीय संघाचा हा सलग 7 वा विजय आहे. याआधी भारतीय संघाने एकाही आवृत्तीत इतके सामने जिंकले नव्हते. डिसेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग 11 वा विजय आहे.