Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या बजेट संबंधित काही मनोरंजक माहिती

Union budget 2020-21
, सोमवार, 27 जानेवारी 2020 (12:15 IST)
देशातील पहिले अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 साली प्रस्तुत केले गेले होते आणि तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून मात्र 3 महिने झाले होते. हे बजेट शणमुखम शेट्टी यांनी प्रस्तुत केले होते.
 
वास्तविकतेत पहिले बजेट पूर्ण बजेट नसून बजेटच्या नावावर प्रस्तुत माहितीत तत्कालीन अर्थव्यवस्थाची समीक्षा होती.
 
नंतर नेहरू यांच्यासह मतभेद झाल्यावर शेट्टी यांनी राजीनामा दिला आणि 35 दिवसांसाठी केसी नियोगीने वित्त मंत्रालयाचे काम स्वत:च्या हाती घेतले.
 
देशाच्या तिसर्‍या अर्थमंत्री जॉन मथाई यांनी स्वतंत्र भारताचे पहिले बजेट प्रस्तुत केले.
 
मोरारजी देशाचे असे अर्थमंत्री झाले ज्यांनी सर्वात अधिक वेळा बजेट प्रस्तुत करण्याचा रिकॉर्ड बनवला. 1959 साली मोरारजी देसाई देशाचे अर्थमंत्री बनले आणि त्यांनी 10 वेळा बजेट प्रस्तुत केला.
 
आपल्या कार्यकाळात मोरारजीने 5 पूर्णकालिक आणि 1 अंतरिम बजेट प्रस्तुत केला. दुसर्‍या कार्यकाळात ते अर्थमंत्री आणि उपपंतप्रधानही होते. त्या दरम्यान त्यांनी 3 पूर्ण आणि 1 अंतरिम बजेट प्रस्तुत केले.
 
वर्ष 2000 पर्यंत केंद्रीय बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रस्तुत केले जात होते. ही परंपरा ब्रिटिश काळाची होती कारण तेव्हा आ‍धी दुपारी ब्रिटिश संसदेत बजेट पास व्हायचं नंतर भारतात. परंतु यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी ही परंपरा तोडली आणि बजेट सकाळी 11 वाजता प्रस्तुत व्हायला लागला. तेव्हापासून बजेट फेब्रुवारीत प्रस्तुत व्हायला लागला.
 
यावेळी बजेट फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थात 1 फेब्रुवारीला प्रस्तुत करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio योजना! केवळ 129 रुपयांच्या रिचार्जवर अमर्यादित विनामूल्य कॉल, डेटाचे देखील लाभ