Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budget 2022 : सर्वसाधारण बजेटनंतर एसी आणि टीव्हीसारखी उपकरणे स्वस्त होतील का?

Budget 2022: Will appliances like AC and TV become cheaper after general budget?Budget 2022 : सर्वसाधारण बजेटनंतर एसी आणि टीव्हीसारखी उपकरणे स्वस्त होतील का? Union Budget 2022-23 Business Marathi
, शनिवार, 29 जानेवारी 2022 (15:17 IST)
1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाकडून प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत. कोरोनानंतर वाढत्या महागाईमुळे  जनतेला या अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची आशा आहे, मात्र अर्थसंकल्प दिलासा देणारा ठरणार की नाही, हे 1 फेब्रुवारीलाच कळेल.
 
एसी आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त करण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. अर्थमंत्री या अर्थसंकल्पात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देऊ शकतात. सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. उद्योगधंद्याबरोबरच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. CEAMA ने सरकारकडे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. CEAMA ची ही मागणी मान्य करून सरकार AC, TV सारख्या गृहोपयोगी वस्तूंवरील GST कमी करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
 सरकार अर्थसंकल्पात दिलासा देणारी घोषणा करू शकते आणि एसीवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणू शकते. त्याचबरोबर टीव्हीसारख्या उपकरणांवरही जीएसटी कमी होऊ शकतो. हे अर्थसंकल्प काळजी वाढवणारे असणार की सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारे असणार हे तर येत्या 1 फेब्रुवारीला कळेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला असे म्हणता येऊ शकत : आरोग्यमंत्री