अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी मोदी सरकारचा नववा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली, तर अनेक जुने शुल्क हटवण्याची घोषणाही केली. या घोषणेनुसार आता सरकार सिगारेटवरील आकस्मिक शुल्कात वाढ करणार आहे. सध्या त्यात 16 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, प्रयोगशाळांमध्ये तयार केलेल्या हिऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमाशुल्कात सूट दिली जाईल, त्यामुळे त्यांच्या किंमतीही कमी होतील.या अर्थसंकल्पात नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली. तसंच यादरम्यान काही गोष्टींवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचं सांगण्यात आलं आहे.
हे बजेट अमृतकालचं बजेट असल्याचं त्यांनी म्हटलं. यामध्ये काय महाग होणार तर काय स्वस्त होणार याकडे एक नजर टाकूया –
काय महाग-
सिगारेटवरील आकस्मिक शुल्क 16 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे.
मिश्रित सीएनजीवरील जीएसटी हटवला जाईल, किंमती कमी होतील
कंपाऊंड रबरवरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. महाग होईल.
सोन्याच्या दागिन्यांवर कस्टम ड्युटी वाढवली
स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक चिमणीवर कस्टम ड्युटी 7.5% वरून 15% झाली.
सिगारेटवर लावण्यात येणारी कस्टम ड्युटी वाढवून 16 टक्के केली जाईल.
सोन्याच्या विटेने बनवण्यात येणाऱ्या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढणार.
चांदही महागणार. त्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्यात येईल.
काय स्वस्त
प्रयोगशाळेत उगवलेल्या हिऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कस्टम ड्युटी सूट.
मोबाईल पार्ट्स आणि कॅमेरा लेन्सेसच्या आयात शुल्कातून सूट देण्याची तरतूद. ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयात सीमा शुल्क सूट.
कॅमेरा लेन्स आणि लीथियम आयन बॅटरी यांसारख्या मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी असेल.
टेलीव्हिजन पॅनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या काही उपकरणांवरही कस्टम ड्युटी असणार नाही.
प्रयोगशाळेत बनवण्यात येणाऱ्या हिऱ्यांच्या बीजावर कस्टम ड्युटी कमी असेल, त्यामुळे त्याची किंमतही कमी होईल.
तांब्यावर लावण्यात आलेली 2.5 टक्के कस्टम ड्युटी बदलण्यात येणार नाही.
डिनेचर्ड इथाईल अल्कोहोल कस्टम ड्युटीमधून हटवण्यात येईल.
क्रूड ग्लिसरिनवर लावण्यात आलेली कस्टम ड्युटी 7.5 वरून 2.5 वर आणली जाईल.
समुद्री व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी झिंग्यावरील आयात दर कमी करण्यात येईल.