Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budget 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पाचं केलं कौतुक, म्हणाले सर्वसामान्यांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प आहे

Budget 2025
, शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 (15:30 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या. तसेच या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. 12 लाखांपर्यंत कर काढण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाबाबत म्हटले आहे की, हा  अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा खिसा भरणारा आहे. 
या अर्थसंकल्पामुळे बचत, गुंतवणूक, वाढ आणि वापर वाढेल. जनता जनार्दन अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो
 
हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांचा खिसा कसा भरेल आणि त्यांची बचत कशी वाढवेल असा आहे. 
 अर्थसंकल्पात रोजगाराच्या सर्वच क्षेत्रांना प्रत्येक प्रकारे प्राधान्य देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातही त्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. एक कोटी हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी विनान भारतम मिशन सुरू करण्यात आले आहे
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेली घोषणा कृषी क्षेत्रात आणि संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेत नव्या क्रांतीचा आधार ठरेल, असे ते म्हणाले. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत असल्याने त्यांना अधिक मदत होईल.

या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला करात सूट देण्यात आली आहे. सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठीही कर कमी करण्यात आला आहे. आपल्या मध्यमवर्गीय, नोकरदार लोकांना ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे त्यांना याचा खूप फायदा होणार आहे. ज्यांना नवीन नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांच्यासाठी आयकरातून ही सूट एक मोठी संधी ठरणार आहे.अणुऊर्जेमध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताने चौथ्या T20 मध्ये 15 धावांनी विजय मिळवला