Dharma Sangrah

आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख पुन्हा वाढवली

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (10:45 IST)
आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन (Permanent Account Number PAN) लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन वाढवून आता 30 जूनपर्यंत मुदत देऊ केली आहे. दोन्ही दस्ताऐवज जोडण्याची तारीख 31 मार्चपर्यंत होती. दरम्यान यामध्ये आता बदल करण्यात आला असून सरकारकडून आता नवव्यांदा हा अवधी वाढवण्यात आला आहे.
 
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार (Aadhar Card) लिंक न केल्यास पॅनकार्ड रद् करण्यात येईल. 
 
मात्र आता ही तारीख आता वाढवण्यात आल्याने ज्यांनी हे काम पूर्ण केले नाही आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे.
 
आधार-पॅन लिंकिंग कसं कराल?
-आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
-तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.
-तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
‘View Link Aadhaar Status’  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
-याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
-UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: मोहन भागवत यांनी गंगाधर राव डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन केले

नाशिक पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावले

अमेरिकी सरकारचा मोठा निर्णय; सोन्याच्या नाण्यांवर ट्रम्प यांचे चित्र छापले जाणार

मध्य पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली

पुढील लेख
Show comments