Reliance Jio अनेक ऑफर्स देत ग्राहकांची सुविधेत वाढ व्हावी या प्रयत्नता असते. यात आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा देखील आहेत. वारंवार परदेशात जात असणार्या ग्राहकांसाठी ही सुविधा देण्यात येते.
या सेवेमुळे यूजर्सला आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान Jio सिम वापरण्याची परवानगी असते. हे इंटरनेशनल पॅक आपल्याला सर्व Jio सेवा याचे लाभ घेण्याची परनवागी देतं. ही सेवा आधीपासून 170 देशांमध्ये उपलब्ध आहे. तथापि ही सर्व्हिस वापरण्यासाठी यूजर्सला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. चला जाणून घ्या त्या स्टेप्सबद्दल-
वेबसाइटसाठी या प्रकारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio रोमिंग सेवा सक्रिय करण्यासाठी आपल्याला साइन-इन पर्यायावर टॅप करावे लागेल आणि OTP प्राप्त करण्यासाठी Jio नंबर लिहावा लागेल. ओटीपी प्राप्त केल्यानंतर आपल्याला साइन इन करावं लागेल आणि सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल. सेटिंग पर्याय स्क्रीनच्या उजवीकडे आहे तेथे manage service section वर क्लिक करावे लागेल.
आता आपल्याला इंटरनेशनल पॅक पर्याय सुरु करावा लागेल. यानंतर आपल्याला आपल्या खात्याची क्रेडिट सीमा वाढवावी लागेल, यासाठी आपल्या प्रीपेड खात्यात पुरेसं बँलन्स असावं.
आता Next पर्यायावर टॅप करावे. नंतर रिलायंस जिओचा एक मेसेज फ्लॅश होईल ज्यात आपल्याला रेफरेंस नंबरसह रिक्वेस्ट सबमिट करण्याचा पर्याय मिळेल. एकदा सेवा सक्रिय झाल्यावर रिलायन्स जिओ आपल्याला एक संदेश पाठवेल.
MyJio अॅपद्वारे अॅक्टिवेट करा
Reliance Jio यूजर्स MyJio अॅप्लिकेशन या माध्यमातून सेवा अॅक्टिवेट करु शकतात. सेवा वापरण्यासाठी आपल्याला कंपनी अॅप्लिकेशन उघडून सेवा सक्रिय कराव्या लागतील. विशेष रुपाने MyJio App च्या होम स्क्रीनवर ISD / International रोमिंग पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
यानंतर रिलायंस जिओ आपल्या सेवा अॅक्टिवेट झाल्याचा एक मेसेज देणार. यानंतर अॅप द्वारे आपण नंबरची क्रेडिट लिमिट वाढवू शकता. आता आपल्या preference and finalize the activation वर टॅप करावं लागेल ज्याने आपण जिओ नंबरद्वारे परदेशात प्रवास दरम्यान प्रतत्येकाशी जुळू शकतात.