Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

या अ‍ॅपने तपासा सोने शुद्ध आहे वा खोटं

या अ‍ॅपने तपासा सोने शुद्ध आहे वा खोटं
, बुधवार, 16 जून 2021 (14:45 IST)
सोन्याचे दागिने आणि संबंधित वस्तूंवर गोल्ड हॉलमार्किंग सरकारने सक्तीचे केले आहे. Gold Hallmarking केल्याशिवाय सोन्याचे दागिने विकणार्‍यांवर दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक सोनं ओळखण्यासाठी अ‍ॅप देखील जारी करण्यात आला आहे.
 
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांवर 5 प्रकारचे मार्क दिसतील. हे मैग्निफाइंग ग्लासतून पाहिले जाऊ शकते. या मार्क्समध्ये BIS Logo, Hallmarking सेंटरचा लोगो, मार्किंग वर्ष, ज्वेलर आयडेंटिफिकेशन नंबर आणि सोन्याचे शुद्धता दर्शविणारी संख्या दिसेल.
 
Gold Hallmarking तापसण्यासाठी मागील वर्षी सरकारने अॅप देखील लॉन्च केलं होतं. BIS-Care हे अॅपचं नाव आहे. याच्या मदतीने आपण उत्पादनाची गुणवत्ता शोधू शकता. म्हणजेच ज्या उत्पादनांवर ISI आणि हॉलमार्किंग गुणवत्ता प्रमाणित आहे त्यांच्या उत्पादनांची तपासणी केली जाऊ शकते. यासह आपण उत्पादनाविषयी तक्रार देखील दाखल करू शकता जे अस्सल नाही. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
 
BIS-Care अॅप एंड्रॉयड यूजर्स गूगल प्ले स्टोरहून डाउनलोड करु शकतात. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, आपल्याला अ‍ॅपमध्ये नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी अ‍ॅप उघडा आणि आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्या. यानंतर, ओटीपीद्वारे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर सत्यापित करा. यानंतर आपण उत्पादनाची गुणवत्ता,  ISI Mark चं मिसयूझ, हॉलमार्क, नोंदणी चिन्ह, दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि BIS शी संबंधित मुद्द्यांवर देखील तक्रार करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओ फायबरने नवीन पोस्टपेड योजना सुरू केली आहे, इंटरनेट बॉक्ससह इन्स्टॉलेशन देखील free असेल