Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चला, आर्थिक कामे करून घ्या, अन्यथा फटका बसेल

Webdunia
रविवार, 7 जून 2020 (09:03 IST)
सरकारने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ३१ मार्चपर्यंत आर्थिक कामे पूर्ण करण्याची मुदत दिली होती. सरकारने त्या मुदतीत आता ३० जूनपर्यंत वाढ केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलेली काही कामे कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
पॅनकार्डला आधारकार्डसोबत लिंक करा 
पॅनला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने ३० जूनपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आधार कार्ड पॅनशी जोडलेले नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या. नाहीतर तुमचे पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. 
करात सूट मिळण्यासाठी गुंतवणूक
आर्थिक वर्ष २०१९-२० साठी प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर कर वाचविण्यासाठी आयकर कायद्यातील कलम ८० सी, ८०डी, ८०ई अंतर्गत गुंतवणूक करण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. 
२०१८-१९ साठी आयटीआर
तुम्ही अद्यापही आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरला नसेल तर तुम्ही आता ३० जून पर्यंत २०१८-१९ साठी आयटीआर रिटर्न भरू शकता.  याशिवाय ३० जूनपर्यंत सुधारित आयटीआरदेखील दाखल करता येणार आहे. 
कर्मचाऱ्यांना मिळणारे फॉर्म-१६
सामान्यतः कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ देण्यात येतो. परंतु सरकारने यावेळेस एका अध्यादेशाद्वारे फॉर्म-१६ भरण्याची तारखेत वाढ करून ३० जून केली आहे. लहान बचत खात्याची ठेव
जर तुम्ही ३१ मार्च २०२० पर्यंत पीपीएफ किंवा सुकन्या समृध्दी खात्यात कोणतीही किमान रक्कम जमा केली नसेल, तर तुम्ही ती रक्कम ३० जून पर्यंत भरू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments