suvichar

FASTag खरेदी करताना सावध रहा, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (15:50 IST)
नेशनल हायवेवरुन प्रवास करताना वाहनांवर FASTag असणं गरजेचं आहे. आता देशभरात सगळ्या टोल नाक्यांवर FASTag पद्धतीनेच टोल स्वीकारलं जात असून हे बंधनकारक झाले आहे.
 
फास्टॅग अनिवार्य झाल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही अशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबद सावध केले आहे. NHAI किंवा IHMCL च्या नावानं अगदी हुबेहुब असे बनावट फास्टॅग विकले जात आहेत. पण ते वैध नाहीत, असा अलर्ट देण्यात येत आहे.
 
या प्रकारे खरेदी करा वैध फास्टॅग 
वैध फास्टॅग फक्त IHMCL च्या अधिकृत वेबसाईटवरच मिळेल. किंवा आप आपण MyFASTag App मार्फत खरेदी करु शकता. शिवाय काही बँक किंवा अधिकृत पीओएस एजंटकडूनही खरेदी करता येईल. या बँकांची यादी IHMCL च्या वेबसाईटवर दिली गेली आहे.
 
मदत
फास्टॅगसंबंधी फसवुणकीची कोणतीही घटना समोर आल्यास NHAI च्या 1033 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. किंवा etc.nodal@ihmcl.com वर तक्रार नोंदवता येईल.

फास्टटॅग विषयी काही माहिती.....
 
फास्टॅगची किंमत आणि रिचार्ज
फास्टॅगची किंमत वाहनाचा प्रकार आणि ज्या माध्यमातून खरेदी करताय त्यावर अवलंबून आहे. कारण प्रत्येक बँकेचे फास्टॅग शुल्क आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स याचे वेगळे नियम आहेत.
 
फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत. फास्टॅग ज्या बँकेकडून घेतला असेल, त्या बँकेचं फास्टॅग वॉलेट वापरणं. किंवा पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या मोबाइल वॉलेट अ‍ॅप्सचा वापर करुन रिचार्ज करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

राज्यात मोठे प्रशासकीय फेरबदल; 11 IAS अधिकाऱ्यांची बदली चर्चेत

पुण्यात मद्यधुंद मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; पोलिसांनाही धक्काबुक्की आणि धमक्या

EMI मध्ये बदल नाही! RBI च्या निर्णयामुळे कर्जदारांना दिलासा

एल निनोचा परिणाम! यंदा महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज; शेतकरी चिंतेत

पुढील लेख
Show comments