Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

PAN Card वरील Photo आणि Signature या प्रकारे बदला, सोपी पद्दत जाणून घ्या

PAN Card वरील Photo आणि Signature या प्रकारे बदला, सोपी पद्दत जाणून घ्या
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (12:01 IST)
पॅन कार्ड म्हणजे 10 अंकी 'पर्मनंट अकाऊंट नंबर'. पॅन कार्ड अत्यंत आवश्यक असलेलं एक महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. बँकाची तशीच इतर विविध कामांसाठी पॅन कार्डची आवश्यकता भासते. अशात आपल्याला पॅन कार्डवरील फोटो बदलायचा असेल तर आपण ऑनलाइन हे कार्य करु शकता. जाणून घ्या यासाठी सोपी पद्धत- 
 
पॅन कार्डवरील फोटो या प्रकारे बदला
सर्वात आधी NSDLच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
नंतर Application Type या पर्यायावर क्लिक करा.
मग Changes किंवा correction in existing PAN Data या पर्यायावर क्लिक करा.
नंतर कॅटेगरी मेनूमधून Individual हा पर्याय निवडा. 
येथे आवश्यक माहिती भरुन सबमिट यावर क्लिक करा.
नंतर PAN Application वरचा KYC पर्याय निवडा.
येथे Photo Mismatch आणि ‘Signature Mismatch' चा पर्याय दिसेल.
फोटो बदलण्यासाठी Photo Mismatch पर्यायवर क्लिक करा.
सिग्नेचर बदलण्यासाठी Signature Mismatch पर्यायवर क्लिक करा.
नंतर आई वडीलांची माहिती भरल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
सर्व माहिती भरल्यानंतर, अर्जदाराचे ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि जन्माचा दाखला जोडा.
डिक्लरेशनवर टिक मार्क करा. 
सबमिट बटणावर क्लिक करा.
फोटो किंवा स्वाक्षरीमध्ये बदल करण्यासाठी भारतातील व्यक्तीसाठी अर्ज फी 101 रुपये आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी 1011 रुपये एवढी आहे.
या प्रक्रियेनंतर 15-अंकी पावती क्रमांक प्राप्त होईल.
अर्जाची प्रिंटआउट आयकर पॅन सर्व्हिसच्या युनिटला पाठवा.
या पावती क्रमांकाद्वारे अर्जाला ट्रॅक करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॅलेंटाईन वीकमध्ये मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेटवले तर तिने मारली मिठी