Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेल्वे तिकीट अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन बुक करणे झाले सोपे जाणून घ्या

Learn how to book train tickets online in a very simple way रेल्वे तिकीट अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन बुक करणे झाले सोपे  relway ticket book kara sopya paddhatine  how to book train ticket on mobile kase karal  tren tikit buk kara ya paddhatine in marathi IRCTC INDIAN RELWAY CATERING  and TOURISM CORPORATIONwebdunia marathi
, सोमवार, 1 मार्च 2021 (18:26 IST)
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कार्पोरेशन(IRCTC)ने प्रवाश्यांसाठी ट्रेनची तिकिटे बुकिंगसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वैशिष्टयांद्वारे आपण काही मिनिटातच ट्रेनची तिकिटे आयरसीटीसीची वेबसाइट वरून मोबाईलने तिकिटे बुक करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या की ट्रेनचे तिकीट कसे बुक करता येईल.
 
या साठी काही चरणांचे अनुसरणं करा.
 
1 वेबसाइटवर जा  
या साठी सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www .irctc.co.in वर  जावे लागणार. 
 
2 लॉगिन खाते -
वेबसाइटवर गेल्यावर तिथे मेनूचा पर्याय दिसेल. आयरसीटीसी खात्यात लॉग इन करण्यासाठी त्यावर क्लिक करा आणि लॉगइन पर्यायावर क्लिक करा येथे, आपले नाव, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि "साइन इन " वर क्लिक करा.
 
3 माझ्या प्रवासाच्या तपशीलांची योजना बनवा-
साइन इन केल्यावर "प्लॅन माय जर्नी " चा पर्याय दिसेल,त्याखाली  
सिलेक्ट फेव्हरेट जर्नी लिस्ट येईल त्यामध्ये काही तपशील भरावे लागणार.
 
* प्रवास सुरू करण्याचे ठिकाण (From Station)-प्रवास सुरू करण्याचे ठिकाण 
* स्टेशन ते स्टेशन(To Station)- ज्या स्थानकावरील प्रवास संपेल त्या स्थानकाचे  नाव.
* प्रवासाची तारीख(Journey Date)- प्रवास करण्याची तारीख.
* तिकिटाचे प्रकार (Ticket Type)- इथे ई-तिकीट राहील. 
 
आपल्या फोन वर मेसेज आणि ईमेल आयडी द्वारे आपल्याला ई तिकीट मिळेल. आपण प्रवासात तपासणीसाठी आपल्या मोबाईलवर तिकीट दाखवू शकता. सर्व माहिती भरल्यावर "सबमिट करा" वर क्लिक करा.
 
4 ट्रेन निवडा- 
सबमिट वर क्लिक करतातच त्या मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांची  यादी मिळेल. 
* कोणती ट्रेन निवडायची आहे.
* कोणत्या कोचने प्रवास आरक्षित करायचा आहे.(एसी /स्लीपर)
* कोणत्या कोट्यात आरक्षण पाहिजे- सामान्य,महिलांचा किंवा व्हीआयपी कोटा. 
 
5 त्वरित बुक करा आणि प्रवाश्यांच्या तपशील द्या.
ज्या दिवसासाठी आयरसीटीसी रेल्वे बुकिंग करावयाचे आहे त्या दिवसासाठी ट्रेन बुक करण्यासाठी " बुक नाऊ " वर क्लिक करा.
आपल्या समोर एक नवीन पृष्ठ येईल, ज्यास पॅसेंजर डिटेल पेज म्हणतात. या मध्ये प्रवाश्यांची काही तपशील द्यावे लागेल.जसे की -
 
* प्रवाश्याचे नाव 
* प्रवाश्याचे वय
* लिंग (मेल/फीमेल)
* प्रवाश्याला पाहिजे असलेला बर्थ 
* 5 वर्षाखाली मुलांसह प्रवास करताना मुलाचे तपशील प्रविष्ट करा.
 
6 फोन नंबर प्रविष्ट करा-
आता खाली फोन नंबर प्रविष्ट करावा लागेल ज्यावर आपले तिकीट येईल. सर्व माहिती आणि फोन नंबर प्रविष्ट केल्यावर, कॅप्चा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा.
 
7 देय मोड निवडा-
आता आपल्याला तिकीटाची सर्व माहिती मिळेल आणि देय मोड देखील दिसेल जसे की - क्रेडिट/डेबिट कार्डाने /वॉलेट ने,इतर देखील बरेच पर्याय आहे देय करण्याचे आपण आपल्या सोयीनुसार निवड करावी. 
अशा प्रकारे आपण घरी बसून देखील तिकीट बुकिंग देखील करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्पीय अधिवेशन: मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळावरून विरोधक आक्रमक