Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आधार कार्डासह ड्रायव्हिंग लायसन्स ला घरी बसून जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आधार कार्डासह ड्रायव्हिंग लायसन्स ला घरी बसून जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (21:20 IST)
सध्या आधार कार्ड इतर कागदपत्रांशी जोडणे खूप महत्वाचे झाले आहे. मग ते पॅन कार्ड असो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. ते लिंक केल्यानंतरच त्यांच्याशी संबंधित सर्व काम सहज करता येतील . पण आता ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी कसे जोडायचे हा प्रश्न आहे. जर आपण अजून आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी लिंक केले नसेल, तर आज आम्ही आपल्याला त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगत आहोत. त्यानंतर आपण स्वतः घरी बसून ही दोन कागदपत्रे जोडू शकता. 
 
ड्रायव्हिंग लायसन्सला आधार कार्डाशी जोडण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
 
* लायसेन्सला आधार कार्डाशी जोडण्यासाठी सर्वप्रथम राज्य परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जा.
* येथे आधार लिंकवर क्लिक करून ड्रॉप-डाउन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.
* हे केल्यानंतर, आपला ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details वर क्लिक करा.
* येथे आपला 12 अंकी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.
* हे केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
*  आता ओटीपी टाकून आपला ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता , तरुणाने कुकरशी लग्न केले, फोटो व्हायरल