Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ऑनलाईन अर्ज कसे करावे, प्रक्रिया जाणून घेऊ या.

ऑनलाईन अर्ज कसे करावे, प्रक्रिया जाणून घेऊ या.
, सोमवार, 15 मार्च 2021 (18:04 IST)
आजच्या काळात सर्व नोकरींसाठी अर्ज ऑनलाईन मागविले जातात. म्हणून प्रत्येक अर्जदाराला त्या बद्दलची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. सर्व परीक्षेंसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची पद्धत एक सारखी असते. परंतु बरेच उमेदवार असे असतात ज्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत माहिती नसते. आज आम्ही सांगत आहोत सरकारी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे. 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. 
 
1 कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याकडे एक स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे देखील आवश्यक आहे. ज्याच्या द्वारे आपण सहजपणे ऑनलाईन अर्ज भरू शकतात. 
 
2 ईमेल आयडी-  अर्ज करण्यापूर्वी आपली एक ईमेल आयडी असायला हवी. नसल्यास तर आपली ईमेल आयडी बनवून घ्यावी, जेणे करून या द्वारे आपल्याला सर्व माहिती मिळू शकेल.
 
3 आधार कार्ड- ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्डाची माहिती मागितली जाते. आता हे अनिवार्य केले आहेत. म्हणून आपण ऑनलाईन अर्ज करताना आपल्या आधार कार्डाची नोंद करून ठेवा. किंवा आपल्या आधार कार्डाचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा. जेणे करून आवश्यकता लागल्यावर ईमेल ने पाठविता येईल. 
 
4  कागदपत्रे- सर्व नोकरीत अर्ज करताना,कागदपत्रे जेपीईजी (jpeg) स्वरूपात मागितले जाते. म्हणून आपली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.जेपीईजी(jpeg)स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये किंवा ईमेल वर सेव्ह करून  ठेवा.   
 
5 फोटो- आपण नवीन फोटो स्कॅन करून मोबाईल मध्ये सेव्ह  करून ठेवा. 
 
6 एम एस वर्ड फाइल्स मध्ये सर्व माहिती ठेवणे- आपण सर्व माहिती टाईप करून आपल्या कडे सेव्ह करून ठेऊ शकता. असं केल्याने आपल्याला अर्ज करण्यासाठी काहीच त्रास होणार नाही आणि अर्ज करण्यात कमी वेळ लागेल.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय करावं-
* सर्वप्रथम आपल्याला संकेत स्थळावर जावं.
* अर्ज उघडल्यावर त्यामध्ये सर्व माहिती प्रविष्ट करा. 
* आपला  फोटो अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
* आता आपण अर्ज शुल्क भरावे. 
* अर्ज शुल्क आपण डेबिट/क्रेडिट कार्डाने आणि नेट बँकिंग द्वारे करू शकता. 
* अर्ज शुल्क जमा केल्यावर अर्ज सबमिट करा.
* आता ह्याचे प्रिंट काढून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन वाझे प्रकरणामुळे उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आलंय का?