वाहन चालविण्याचा परवाना कायदेशीररित्या वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांपैकी एक आहे. वाहन दुचाकी असो, तीन किंवा चारचाकी. ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) शिवाय गाडी चालवल्यास दंडाची तरतूद आहे.
पूर्वी ड्राइव्हिंग लायसेन्स बनवणे डोके दुखी होते. आरटीओच्या फेऱ्या माराव्या लागायच्या.किंवा मध्यस्थी कडून काम करावे लागायचे.त्यासाठी पैसे जास्त मोजावे लागायचे. पण इंटरनेटच्या युगात, जेव्हा प्रत्येक काम डिजिटल माध्यमातून सहज केले जाते, तेव्हा तुम्हाला DL बनवण्याची काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. फॉर्म भरण्यापासून ते पेमेंटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे.जरी सर्व कामे ऑनलाईन होत असले तरीही कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रक्रिया करण्यासाठी आरटीओला जावे लागणार.
नवीन ड्राइव्हिंग लायसेन्स साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी, तुम्ही परिवर्तन वेबसाइटवर जा आणि तुम्हाला आवश्यक असलेली सेवा निवडा. पुढे, राज्य निवडा आणि Learner's License अंतर्गत, 'Apply for New Learner's License' वर क्लिक करा.
यानंतर, काळजीपूर्वक फॉर्म भरा. कोणत्याही चुका होणार नाहीत याची खात्री करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचे अनेक वेळा पुनरावलोकन करा. पुढे, तुम्हाला सहाय्यक कागदपत्रे, फोटो अपलोड करावे लागतील आणि नंतर दस्तऐवजावर ई-स्वाक्षरी करावी लागेल. यानंतर फी भरावी लागेल, स्लॉट बुक करावा लागेल आणि शिकाऊ परवाना चाचणी द्यावी लागेल.
लक्षात ठेवा की आधार कार्ड असलेल्या अर्जदारांसाठी, ऑनलाइन चाचणी घेतली जाऊ शकते आणि ई-लर्नर परवाना त्वरित जारी केला जाईल. तथापि, आधार कार्ड नसलेल्या अर्जदारांसाठी समर्पित केंद्रावर जाऊन चाचणी द्यावी लागेल.
शिकाऊ परवाना मिळाल्यानंतर, तुम्ही गाडी चालवण्यास किंवा राइड करण्यास तयार आहात.काही नियमांसाठी तुम्ही लर्नर असल्याचे सांगावे लागणार. आणि तुमच्याकडे वैध परवाना आहे. हे दाखवावे लागणार.
शिकाऊ परवाना जारी झाल्यानंतर, तुम्हाला ड्रायव्हिंग/राइडिंग चाचणी देण्यासाठी 30 दिवसांनी RTO ला भेट देण्यास सांगितले जाईल, त्यानंतर कायमस्वरूपी परवाना जारी केला जाईल. लक्षात ठेवा की येथे वर्णन केलेल्या काही प्रक्रिया राज्यानुसार भिन्न असू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे प्रक्रिया तशीच राहते.