Marathi Biodata Maker

Money Saving Tips पैशांची बचत कशी करावी

Webdunia
योग्य प्रकारे पैसे वाचवले की भविष्यासाठी कामास येतात. आपल्या स्वत:ला पैसे वाचवण्याची सवय तर हवीच सोबत कुटुंबातील इतर सदस्यांना ही सवय लावावी. योग्य तिथे खर्च करावा आणि योग्य तिथे पैसे वाचवावे. घरातील मुलांनाही लहानपणापासूनच फालतू खर्च आणि बचत याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. पैशांची बचत केल्यास भविष्‍यात अडचणींना सामोरा जाण्यापासून वाचता येऊ शकतं.
 
पैशाचे महत्त्व जाणून घ्या
सर्वांना पैशाचे महत्त्व जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कुटुंबातील सर्वांना समजावून सांगा की तुम्ही जे पैसे कमवत आहात ते फक्त सर्वांच्या भविष्यासाठी आहे आणि हे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हुशारीने आणि योग्य ठिकाणीच खर्च केले पाहिजे.
 
गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी थांबवावी
अनेकदा मॉल किंवा मार्केटमध्ये गेल्यावर आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो, एकीकडे यामुळे फालतू खर्च होतो, तर दुसरीकडे अशा सवयी वाईट असतात. अशा परिस्थितीत जेव्हा मुले एखाद्या गोष्टीबद्दल खूप हट्ट करत असले किंवा आपलं ही मन उगाचच नको त्या वस्तूंकडे जात असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात काही गैर नाही. 
 
पैसे वाचवण्याची सवय लावा
आपले पैसे आल्या आल्या खर्च होत असतील तर लहान मुलांप्रमाणेच पिगी बँक खरेदी करुन त्यात पैसे टाकण्याची सवय देखील लावू शकता. किंवा एक ठराविक दिवशी ठराविक पैसे फिक्स करण्याची सवय लावा.
 
प्राधान्यक्रम ठरवा
तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकत नाही. जर तुम्हाला छंद आणि गरजेपैकी एक निवडायची असेल तर प्राधान्यक्रम ठरवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य, परवाने रद्द होणार

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणा बाबत दिले स्पष्टीकरण

नाशिकच्या एका मोठ्या कंपनीत लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप, ६ जणांना अटक

मुंबईत 2 विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू, पाच जणांना अटक

पुढील लेख
Show comments