Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार इन्शुरन्सबद्दल 'या' महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (23:17 IST)
वैयक्तिक लाईफ इन्शुरन्स (जीवन विमा) आणि हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) याबरोबरच कार किंवा ऑटो इन्शुरन्स घेणंही अत्यंत महत्त्वाचं असतं.कोव्हिडनंतरच्या काळामध्ये बहुतांश कुटुंब ही स्वतंत्र वाहनात प्रवास करणं पसंत करत आहेत. त्यामुळं गेल्या दोन वर्षांमध्ये कारच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
जर इतरही काही गोष्टींचा विचार केला, तर आगामी दहा वर्षांमध्ये वैयक्तिक वाहनांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची प्रचंड शक्यता आहे.
 
अशा कार किंवा वैयक्तिक वाहनाबरोबर इन्शुरन्स घेणं अनिवार्य असतं. त्यामुळं इन्शुरन्स कंपन्यांचे नियम आणि हा इन्शुरन्स घेताना काय खबरदारी घ्यायला हवी, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
कार इन्शुरन्समधील महत्त्वाचे मुद्दे
दुर्दैवानं तुम्हाला कार इन्शुरन्ससाठी क्लेम (दावा) करण्याची गरज पडलीच तर ती आपल्या खिशातून कमीत कमी खर्च होऊन पूर्ववत व्हावी, याची काळजी घेतली गेली पाहिजे.
 
विमा सुविधा ही अपघात आणि चोरी दोन्हीसाठी लागू असायला हवी.
 
लहान दुर्घटनेपासून ते एखाद्या मोठ्या दुर्घटनेपर्यंत उपयोगी असेल अशा प्रकारचे कव्हरेज घ्यायला हवे. विशेषतः 'बंपर टू बंपर कव्हरेज' असणं महत्त्वाचं असतं. काही पॉलिसींमध्ये ही सुविधा देण्यात येत नाही.
 
पॉलिसीचा प्रिमियम म्हणजेच हप्ता थोडा जास्त असला तरी चालेल, पण ज्यात वर्षातून किमान दोन वेळा क्लेम करण्याची सुविधा असेल, अशी पॉलिसी घ्यावी.
 
दरवर्षी कारच्या मूल्याबरोबर कव्हरेज देखील कमी होत जाते. अशा परिस्थितीत योग्य विचार करून पॉलिसीबरोबर रायडरची घ्यायला हवा.
 
काही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अपघातात नुकसान झालेल्या पार्ट्सपैकी फक्त 50 टक्के पार्ट कव्हर केले जातात. उर्वरित रक्कम ही पॉलिसी धारकाला भरावी लागत असते.
 
जर तुम्ही याबाबतीत काळजी घेतली तर, तुम्ही अत्यंत कमी मोबदल्यात देखील अनपेक्षित खर्च टाळू शकता.
 
थर्ड पार्टी इन्शुरन्स
आपल्या वाहनामुळं अपघातात दुसऱ्या वाहनाला किंवा व्यक्तीला झालेल्या नुकसानाचं कव्हरेज म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स असते.
 
भारतीय मोटर वाहन कायद्यानुसार कारसारख्या मोठ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य बाब आहे.
 
त्यामुळं डीलर कार विक्री करताना ही बाब लक्षात घेऊन नोंदणीच्या खर्चाबरोबरच इन्शुरन्सचा प्रीमियमही खरेदी करणाऱ्याकडून घेत असतात.
पण या इन्शुरन्समध्ये पॉलिसी असलेल्या व्यक्तीच्या स्वतःच्या वाहनाचं नुकसान मात्र कव्हर होत नसतं. त्यामुळंच स्वतःच्या वाहनालाही इन्शुरन्स कव्हर हवं असल्यास त्यासाठी स्वतंत्र इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागते.
 
वाहतूक पोलीस ज्यावेळी कारच्या कागदपत्रांची तपासणी करत असतात त्यावेळी नोंदणीच्या कागदपत्रांसह ड्रायव्हिंग लायसन्स आणि उत्सर्जन प्रमाणपत्र ही कागदपत्रं दाखवणं गरजेचं असतं.
 
त्यामुळं अपघाताच्या प्रकरणाबरोबरच, वाहतूकसंबंधी गुन्ह्यांपासून दूर राहण्यासाठी थर्ड पार्टी आणि स्वतःच्या वाहनाचा इन्शुरन्सदेखिल काढायलाच हवा.
 
IDV म्हणजे काय?
इन्शुरन्स डिक्लेर्ड व्हॅल्यू (IDV)ही वाहनांच्या इन्शुरन्समधील सर्वात महत्त्वाची बाब आहे. वाहनाची चोरी झाली तेव्हाही हे उपयोगी ठरत असते.
 
इन्शुरन्स कंपनीच्यानुसार आपल्या वाहनाची सध्याची किंमत किती आहे? हे IDV द्वारे समजू शकते. जर आपल्या वाहनाचं एवढं नुकसान झालं असेल की, त्याची दुरुस्ती करणं शक्यच नसेल अशावेळी इन्शुरन्स कंपनी IDV नुसार ठरवलेली किंमत आपल्याला देत असते.
तसंच जर आपली गाडी चोरी झाली तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला जास्तीत जास्त जी रक्कम देत असते ती असते IDV.
 
त्यामुळं आपल्याला बाजारात आपल्या गाडीची सध्याची किंमत काय आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार कोणती कंपनी आपल्याला योग्य IDV देईल याचा शोध घ्यायला हवा.
 
सध्या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या पॉलिसींमध्ये ते ठळकपणे दिलेलं असतं. तसं पाहिलं तर IDV बाबत फार काळजी करण्याची गरज नसते. पण अगदीच निष्काळजी देखील राहता कामा नये.
 
'नो क्लेम बोनस' म्हणजे काय?
सर्व इन्शुरन्स पॉलिसी वार्षिक असतात. जर एखाद्या वर्षी तुम्ही काहीही क्लेम केला नाही, तर त्याच्या पुढच्या वर्षीच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रिमियममध्ये डिस्काऊंट दिलं जातं. त्याला 'नो क्लेम बोनस म्हणतात.
 
विविध पॉलिसींमध्ये नो क्लेम बोनस 10% ते जास्तीत जास्त 25% पर्यंत असतो. तसंच नो क्लेम पॉलिसींमध्ये एका कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीची पॉलिसी घेणंही सहज शक्य असतं.
 
नो क्लेम बोनस ची सुविधा असलेली पॉलिसी घेतल्यास आपल्याला भविष्यात भरावा लागणारा प्रिमियम कमी होऊ शकतो.
 
जास्तीत जास्त नो क्लेम बोनस देणाऱ्या पॉलिसींचा प्रिमियम काहीसा जास्त असतो. वाहनधारक किरकोळ अपघात किंवा दुरुस्ती खर्चासाठी क्लेम करण्याऐवजी स्वतःच्या खिशातून खर्च करूनही नो क्लेम बोनचा लाभ घेऊ शकतात.
 
रायडर्सबद्दल योग्य माहिती घ्या
कंपन्या कार इन्शुरन्सशिवाय इतरही अनेक सेवा देऊ करतात.
 
या सर्व गोष्टी पॉलिसी घेण्याआधीच समजून घ्यायला हव्या. काही कंपन्या केवळ त्यांच्या ठराविक सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून कॅशलेस इन्शुरन्स देऊ करतात.
 
अनेकदा हे काहीसं विचित्र वाटू शकतं. तसंच कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरबरोबर करारही असतात. त्यानुसार जर गाडी रस्त्यात कुठेही बंद पडली तर ती त्यांना स्वतःला सर्व्हिस सेंटरपर्यंत आणावी लागते.
 
तुम्ही हे सर्व काळजीपूर्वक जाणून घेऊन, नंतरच गाडीसाठी इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हवी.
 
सध्या भारतात 32 कंपन्या वाहन विम्याची सेवा पुरवतात.
 
न्यू इंजिया अश्युरन्स, एचडीएफसी, अर्गो, बजाज अलायन्झ, रॉयल सुंदरम या त्यापैकी काही आघाडीच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत.
 
(Note: हा लेख केवळ संबंधित विषय समजण्यासाठी म्हणून आहे. संबंधित निर्णय हा तुमच्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानेच घ्यावा.)
 






Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

मेक्सिकोमध्ये बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार

माजी भारतीय पोलो खेळाडू एचएस सोढ़ी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन

कांद्याने रडवले ! 5 वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक भाव, जाणून घ्या किती किमतीला विकली जात आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बालासाहेब ठाकरे पक्षाचा विश्वासघात करण्याचा संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments