Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

UP Elections 2022: यूपीचे पुढील सरकार या 36 जागांवर ठरणार का?

UP Elections 2022: यूपीचे पुढील सरकार या 36 जागांवर ठरणार का?
, शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (16:43 IST)
2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. उत्तर प्रदेशात यंदा 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, 10 मार्चला येणारे खरे निकाल हेच उत्तर प्रदेशात सरकार कोणाचे असेल हे ठरवेल. अखिलेश पुनरागमन करतील की योगी सत्तेच्या सिंहासनावर कायम राहतील. 

वाराणसी आणि त्याच्या लगतचे पाच जिल्हे - जौनपूर, गाझीपूर, चंदौली, मिर्झापूर आणि भदोही - असे जिल्हे आहेत ज्यांच्या विधानसभा मतदारसंघांचा यूपी निवडणुकीत लक्षणीय परिणाम होऊ शकतो. या जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. पूर्वांचलचा हा भाग पीएम मोदींचा बालेकिल्ला मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः वाराणसीचे दोन वेळा खासदार आहेत.
 
यापैकी निम्म्या जागा ज्याने जिंकल्या, त्याचे सरकार यूपीमध्ये बनले असे म्हटले जात आहे, 2007 मध्ये मायावतींच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी या 36 पैकी 20 जागा काबीज केल्या होत्या. 2012 च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाला 21 जागा मिळाल्या. सपाने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते आणि मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री केले होते.  
 
2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने कोणताही सी एम  चेहरा न घेता निवडणूक लढवली. मात्र असे असतानाही या 5 जिल्ह्यांतील 36 पैकी 21 जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. पूर्ण बहुमत मिळालेल्या भाजपने नंतर योगी आदित्यनाथ यांना यूपीचे मुख्यमंत्री केले.
 
या त्या 36 जागा आहेत, जे पुढील उत्तर प्रदेश सरकार ठरवू शकतात

जौनपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
बदलापूर, शाहगंज, जौनपूर, मल्हानी, मुंगडा, बादशाहपूर, मच्छलीशहर(एससी)
मारियाहू, जाफ्राबाद,केरकट ( एससी )
 
गाझीपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
जखानिया, सैदपूर, गाझीपूर सदर, जंगीपूर,जहुराबाद, मोहम्मदाबाद, जमानिया
 
चंदौली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
मुगलसराय, सकलडिहा, सय्यदराजा ,चकिया 
 
वाराणसी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
पिंद्रा, अजगरा, शिवपूर, रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कॅन्ट, सेवापुरी 
 
भदोही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
भदोही, ज्ञानपूर, औराई
 
मिर्झापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
 
छनबे,  मिर्झापूर, मझवां, चुनार, मरिहान
 
यूपीच्या 403 विधानसभा जागांवर 7 टप्प्यात मतदान 
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 1,74,351 असून सुमारे 15 कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा बिघडली