Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Kiss Day 2023: प्रत्येक चुंबनाचा अर्थ वेगळा आहे, जाणून घ्या किसच्या प्रकारांबद्दल

kiss day
, सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (07:47 IST)
प्रेमात स्पर्श महत्त्वाची भूमिका बजावतो. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचा स्पर्श असो किंवा जोडीदाराचा स्पर्श असो. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते किंवा त्यांच्यासोबत नातेसंबंध असतात तेव्हा आपल्याला जोडीदारासोबत हात धरून  चालायला आवडते. जेव्हा जोडीदार मिठी मारतो तेव्हा ते खरोखर एखाद्या जादूई झप्पी पेक्षा कमी नसते, ज्यामुळे आपण थकवा, तणाव आणि त्रास विसरता. त्याचप्रमाणे प्रेमात चुंबन घेण्याचेही स्वतःचे महत्त्व आहे.
 
व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी म्हणजे 13 फेब्रुवारीला किस डे असतो. या दिवशी जोडीदाराने केलेल्या चुंबनाने त्यांच्या भावना समजू शकतात.प्रत्येक चुंबनाचे 
वेग वेगळे प्रकार आणि अर्थ आहे. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
चुंबनाचे प्रकार आणि त्यांचा अर्थ 

कपाळावर चुंबन-कपाळावर चुंबन घेत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्या आयुष्यात आपण खूप महत्वाचे आहात. कपाळावर चुंबन घेणं अतूट आणि खोल नात्याचे प्रतीक आहे.  पालक सहसा आपल्या मुलांचे अशा प्रकारे चुंबन घेतात.
 
हातावर चुंबन घेणे - हातावर चुंबन घेणे म्हणजे चुंबन घेणारा आपला आदर करतो. या प्रकारा चे चुंबन प्रेमी शिवाय मित्रही करतात.
 
कानावर चुंबन - जेव्हा जोडीदार कानाचे चुंबन घेतात तेव्हा त्याला इअरलोब किस म्हणतात. हे चुंबन रोमँटिक चुंबन मानले जाते. अशा प्रकारचे किस करून प्रेमी आपल्या जोडीदाराला रोमान्सची अनुभूती देतात.
 
 
स्पायडर किस-जेव्हा पार्टनर मागून किस करतो तेव्हा त्याला स्पायडर किस म्हणतात. हे नात्यातील आपुलकी दर्शवतो.
 
एस्किमोचे चुंबन -हे घेताना जोडप्याचे नाक आदळते तेव्हा त्याला एस्किमो किस म्हणतात .हे किस जोडीदाराच्या रोमान्सची अनुभूती देतो.
 
फ्लाइंग किस-जेव्हा पार्टनर तुम्हाला स्पर्श न करता दुरूनच चुंबन घेण्याचे हावभाव करतो तेव्हा त्याला फ्लाइंग किस म्हणतात. याचा अर्थ आहे की जोडीदार आपल्याला मिस करत आहे.
 
ओठांवर चुंबन - हे कोणत्या प्रेमासह प्रणय दर्शवते. फक्त अशा जोडप्यांमध्येच असतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजगड किल्ला