Dharma Sangrah

Rose Day पासून वेलेंटाइन डे ची सुरवात का होते?

Webdunia
शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 (06:00 IST)
गुलाबाच्या फुलाच्या रंगाचा वेगवेगळा अर्थ असतो. जाणून घ्या कोणाला लाल गुलाब द्यावा गुलाबाचे फुल म्हणजे प्रेमाचे प्रतिक.
 
Rose Day 2026 फेब्रुवारी महिना खूप खास असतो. कारण या महिन्यात वेलेंटाइन डे वीक साजरा केला जातो. कपल्ससाठी हा वीक खास असतो. ज्यांना प्रेम व्यक्त करायचे असते त्यांच्यासाठी वेलंटाइन डे ही एक संधी असते. 7 फेब्रुवारी पासून वेलेंटाइन डे वीक सुरु होतो आणि 14 फेब्रुवारीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो. 
 
या वीकची सुरवात रोज डे म्हणजे गुलाबाचे फुल देऊन सुरु होते. जोडीदाराला फुल देणे हा प्रेमळ क्षण असतो. फुल  हे मुलींना जास्त प्रमाणात आवडतात. प्रत्येक फुलाचा अर्थ वेगळा असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की वेलेंटाइन डे वीकची सुरुवात गुलाबाच्या फुलापासून का होते? चला जाणून घेऊया कारण 
 
गुलाबचे फुल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. हे फुल देऊन मनातील प्रेम व्यक्त करणे ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. भारतात तसेच वेस्टर्न देशात पण मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचे आदान-प्रदान केले जाते. गुलाबाच्या फुलाच्या माध्यमातून तुम्ही न बोलता प्रेमाची भावना व्यक्त करू शकतात. कारण हे फुल खुप खास असते आणि हे खास लोकांना दिले जाते. 
 
गुलाबाचे फुल रंगाचा वेगवेगळा अर्थ 
1. लाल गुलाब- लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जर तुम्ही कोणावर खूप प्रेम करत आहात आणि शब्दात सांगायला जमत नसेल तर लाल गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतात. वेलेंटाइन वीक मध्ये गुलाब दिल्यावर समोरील व्यक्ति तुमच्या मनातील ओळखून घेईल.
 
2. पिवळा गुलाब- पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानले जाते. हा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मित्राजवळ आपली पक्की मैत्री असल्याच्या भावना व्यक्त करू शकतात आणि खास असल्याची जाणीव करून देऊ शकतात. पिवळा गुलाब म्हणजे नवी सुरवात हे प्रतिक मानले जाते. 
 
3. गुलाबी गुलाब- गुलाबी गुलाब हा दिसायला खूप सुंदर आणि कोमल असतो गुलाब त्यांनाच दिला जातो जे तुम्हाला आवडतात. रोज डे च्या दिवशी तुम्ही गुलाबी गुलाब पण तुमच्यासाठी खास असलेल्या व्यक्तीला देऊ शकतात. 
 
4. नारंगी गुलाब- नारंगी गुलाब हा प्रेमाच्या भावनेचे प्रतिक असते. नारंगी गुलाब देऊन तुम्ही तुमच्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करू शकतात. 
 
5. पांढरा गुलाब- पांढरा गुलाब हा शांतीचे प्रतिक असतो या रंगाचे गुलाब देऊन तुम्ही नात्यात निर्माण झालेला दुरावा, गैरसमज मिटवून पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकतात. जर तुमचा जोडीदार तुमच्या वर नाराज असेल तर त्यांना पांढरा गुलाब दया. मग नंतर इतर रंगाचे गुलाब दया.  
ALSO READ: Rose Day 2026 Wishes in Marathi 'रोज डे' च्या शुभेच्छा
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मिठाईवाल्यांप्रमाणे कुरकुरीत आणि लुसलुशीत जिलेबी कशी बनवायची? लिहून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात जांभूळ खाण्याची योग्य पद्धत व फायदे जाणून घ्या

RBI Grade B Recruitment 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रेड बी ६० पदांसाठी भरती, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

दररोजच्या प्रवासामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत असेल, तर केसांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पहा

पोटावरील सूज आणि वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते

पुढील लेख
Show comments