ओढ तुझी विठुमऊली चूप बसू देईना,
वारी स यंदा ही, मज येता येईना,
कालचक्र निसर्गाचे काही वेगळे चालले,
सुरू होते सर्व, अवचित बंद जाहले,
कवाडे तुझी ही बंद जाहली केव्हांच,
मनाची दार उघडून दर्शन घेतले तुझेच,
तुला ही झाली आता सवय एकटे राहायची,
गोंगाट होता सभोवताली, त्यातून मुक्त व्हायची,
परी प्रेम, माया तुझी आहे तशीच भक्ता परी,
येतो धावून हाकेला, कवाडं बंद असले तरी,
यातून एकच उमगे मला,तूच सर्व ठायी रे,
गरज नाही वारीची,घरीच मस्तक ठेवीन तुझे पायी रे!
......अश्विनी थत्ते.