Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देवशयनी एकादशी व्रत पूजा विधी

देवशयनी एकादशी व्रत पूजा विधी
, शनिवार, 27 जून 2020 (11:01 IST)
आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीलाच देव शयनी एकादशी म्हटलं जातं. या दिवसापासूनच श्रीहरी भगवान विष्णू क्षीर -सागरात झोपतात. कधी कधी या तिथीला 'पद्मनाभा' असे ही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो. 
 
पुराणामध्ये असे ही म्हटलं आहे की भगवान विष्णू या दिवसापासून चार महिन्यापर्यंत (चातुर्मास) पाताळात राजा बळीच्या दारी राहून कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला परत येतात. या मुळे या दिवसाला 'देवशयनी' आणि कार्तिक शुक्लपक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. यंदाच्या वर्षी देवशयनी ही 1 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. आणि 25 नोव्हेंबरला प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाणार आहे.
तर जाणून घ्या देवशयनी एकादशी व्रत विधी :
 
* या दिवशी सकाळी लवकर उठावं.
* घराची स्वच्छता आणि दररोजच्या नित्यक्रमातून निवृत्त व्हावे.
* अंघोळ करून घरात पवित्र पाणी शिंपडावं.
* घराच्या देवघरात किंवा कोणत्याही पावित्र्य जागी प्रभू श्रीहरी विष्णूंची सोन्या, तांब्या किंवा पितळ्याची मूर्ती स्थापित करावी.
* त्या मूर्तीची विधी विधानाने षोडशोपचार पूजा करावी.
* त्या नंतर श्री हरी विष्णूंना पितांबर अर्पण करावं.
* या नंतर कथा ऐकावी.
* नंतर आरती करून नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा.
* शेवटी पांढऱ्या चादरीने झाकलेल्या उशी आणि गादीवाल्या पलंगावर श्री विष्णू यांना झोपवावे. 
* माणसाला या चार महिन्यासाठी आपल्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार दैनंदिनच्या व्यवहाराच्या पदार्थांचा त्याग करावं आणि ग्राह्य करावं. 
 
देवशयनी एकादशी व्रताचे फळ :
* ब्रह्मवैवर्त पुराणात देवशयनी एकादशीच्या विशेष महात्म्याचे वर्णन केले आहे. हे व्रत कैवल्य केल्याने प्राण्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
* माणसाचे सर्व पाप नाहीसे होतात.
* उपवासधारक चातुर्मासाला विधी विधानाने पाळतील तर त्याचा महाफल प्राप्ती होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आषाढी एकादशी: वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व