Daily Horoscope

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश
दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी.. 
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा, गुंफून येवो तुमच्या दारी.. 
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
घरात लक्ष्मीचा वास, अंगणी दिव्यांची आरास… 
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे
सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत, 
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
 
लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहो,
दुःखाचा सावट कधी तुमच्यावर न येवो
समृद्धी, आरोग्य आणि आनंद तुम्हाला मिळो,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दिव्यांची आरास आणि महालक्ष्मीची कृपा,
तुमच्या आयुष्यातील दूर होवो सर्व संकटे व आपत्ती
हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो
लक्ष्मीपूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेले लक्ष्मीपूजन,
तुमच्या घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य घेऊन येवो
महालक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरू दे,
महालक्ष्मीच्या आगमनाने तुमचे घर धनाने भरू दे.
यशाची नवी शिखरे तुम्ही गाठत राहा
दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
सोन्यासारख्या माणसांना सोन्यासारखा सण,
महालक्ष्मी तुमच्या घरी करो कायमस्वरूपी आगमन
आरोग्य आणि समृद्धीची लाभो तुम्हाला भेट
लक्ष्मीपूजनानिमित्त मंगलमय शुभेच्छा!
 
लक्ष्मीमातेचे आगमन म्हणजे घरात प्रकाश, प्रेम आणि समृद्धीचा प्रवास
तिच्या कृपेने तुमचं जीवन सोन्याप्रमाणे चमकदार होवो, 
आणि तुमच्या प्रत्येक कार्यात यश लाभो
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दारिद्र्य पळो, समृद्धी येवो,
महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो.
सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होवोत.
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
पणत्यांच्या लखलखाटाने उजळून निघो तुमचे घर,
सकारात्मक ऊर्जेचा होवो तुमच्या आयुष्यात प्रसार
महालक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो अपरंपार 
शुभ लक्ष्मीपूजन!
 
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी आणि उमा,
या सर्वांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन होवो पूर्ण समाधान
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
 
लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस,
तुमच्या व्यवसायात आणि आयुष्यात घेऊन येवो प्रगतीचा ध्यास
भरभराटीचे आणि आनंदाचे जावो हे वर्ष
लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
सणाचा आनंद आणि दिव्यांचा प्रकाश,
तुमच्या आयुष्यात आणो सुखाचा नवीन उल्हास
महालक्ष्मीच्या चरणी हीच एक प्रार्थना!
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अथांग समृद्धी आणि निरोगी आरोग्य मिळो,
तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा आनंदाने उजळो
महालक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व दुःखे दूर होवोत
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
केरसुणीची पूजा आणि लक्ष्मीचे आगमन,
पवित्र वातावरणाने प्रसन्न होवो तुमचे मन
सुख-समृद्धीचा हा सण तुमच्या जीवनात नवा प्रकाश आणो
लक्ष्मीपूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
 
महालक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरात सुख-शांती नांदो,
तुमच्या कष्टाला यशाची गोड फळे मिळो
लक्ष्मीपूजनाचा हा सण तुम्हाला भरभराटीचा जावो
हार्दिक शुभेच्छा!
 
लक्ष्मी आली तुमच्या दारी, 
सुख समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी! 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मी पूजन शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वांगी खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या! कोणत्या लोकांनी वांगी खाताना घ्यावी काळजी?