Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shravan Somwar 2026 Wishes in Marahti श्रावणी सोमवरच्या शुभेच्छा

Shravan Somwar 2026 Wishes in Marahti
श्रावण आला, 
शिवाची कृपा घेऊन आला, 
सरी बरसल्या, 
आसमंत बहरला... 
श्रावणी सोमवारच्या 
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
महादेवाच्या कृपेने 
तुमचे जीवन सुख, समाधान 
आणि समृद्धीने भरून जावो
'ॐ नमः शिवाय'
 
भक्तिभावाने शिवाला वंदूया त्रिवार, 
सुख-समृद्धीने नाहून निघू दे हा संसार
श्रावणी सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा!
webdunia
हर हर महादेव! 
भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 
आणि सदैव आपल्या पाठीशी राहो.
 
श्रावणी सोमवाराच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 
देवाधिदेव महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत 
आणि तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणोत.
 
ओम नमः शिवाय! 
श्रावणातील पवित्र सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा
महादेवाचा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना.
 
भक्तीचा सुगंध, 
महादेवाचा ध्यास 
आणि श्रावणाची प्रसन्नता! 
तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवाराच्या 
खूप खूप शुभेच्छा
हर हर महादेव!
webdunia
भोळ्या शंभो शंकराची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे दूर होऊन 
आरोग्य आणि सुख लाभो
शुभ श्रावणी सोमवार!
 
श्रावण सोमवाराच्या पावन पर्वावर 
महादेवाच्या चरणी प्रार्थना की, 
तुमच्या घरात नेहमी शांती, समृद्धी 
आणि आनंदाचे वातावरण राहो
हर हर महादेव!
webdunia
शंकराच्या भक्तीत लीन होण्याचा हा पवित्र काळ! 
श्रावणी सोमवाराच्या तुम्हा सर्वांना 
आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा
 
ज्यांच्या मस्तकावर चंद्र, गळ्यात नाग आणि हातात त्रिशूळ आहे, 
अशा भगवान महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो
श्रावणी सोमवाराच्या शुभेच्छा!
 
बेलपत्र, पांढरी फुले आणि पाण्याचा अभिषेक अर्पण करून महादेवाला प्रसन्न करूया
तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
webdunia
महादेवाची भक्ती आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देते
श्रावणातील या पवित्र सोमवारी महादेवाचे आशीर्वाद तुम्हाला लाभोत
ओम नमः शिवाय!
 
श्रावणाचा महिना घेऊन आलाय शिवभक्तीचा आनंद! 
श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने 
तुमच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता येवो, हीच सदिच्छा.
 
शिव नामाचा जप करा, 
मनातील सर्व चिंता दूर करा
श्रावणी सोमवाराच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा! 
जय भोलेनाथ!
webdunia
सत्य, शिव आणि सुंदर असलेल्या महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी सदैव राहो
श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Lion Day 2026: जागतिक सिंह दिनाचा इतिहास, सिंहा संबंधित तथ्य जाणून घ्या