Yoga Tips व्यक्तीला जर स्वस्थ राहायचे असेल तर कमीत कमी १५ मिनिट योगासन करायला पाहिजेत. जर तुम्हाला योगासन करण्यासाठी वेळ नाही तर आम्ही आपणास आशा टिप्स सांगू की योगासन न करता तुम्ही आरोग्यदायी रहाल.
१. प्राणायाम करा : प्राणायाम करताना तीन क्रिया करतात. पूरक, कुम्भक, रेचक. जर तुम्ही अनुलोम विलोम किंवा नाडी शोधून प्राणायाम करतात तर तुमचे सम्पूर्ण शरीराचे रक्त संचार सुचारु रुपने चालत राहिल. यामुळे शरीरातील टॉक्सिन पण बाहेर निघून जातात. ज्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी राहतो. तुम्हाला फक्त हा पाच मिनिटांचा प्राणायाम करायचा आहे. हे तुम्ही ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून देखील करू शकतात.
२. योग मुद्रा : योग मुद्रा खूप प्रकारच्या असतात. यात हस्त मुद्रा ही छान असते. हाताच्या दहा बोटांनी विशेष प्रकारची आकृती बनवणे ही हस्तमुद्रा संबोधली गेली आहे. बोटांच्या पाच वर्गातून वेगवेगळ्या विदयुत धारा वाहत असतात. यामुळे मुद्रा विज्ञान मध्ये बोटांना रोगांनुसार आपसात स्पर्श करतात तेव्हा थांबलेली असंतुलित विदयुत वाहून शरीराची शक्ति पुन्हा जागृत करते आणि आपले शरीर निरोगी व्हायला लागते. ही अद्भुत मुद्रा करताना ती आपला परिणाम दाखवायला सुरवात करते. सामान्यत: वेगवेगळ्या मुद्रांनी वेगवेगळ्या रोगांसाठी लाभ मिळतो. मनात सकारात्मक उर्जाचा विकास होतो. शरीरात कुठेही ऊर्जे मध्ये अवरोध उत्पन्न होत असेल तर मुद्रांनी तो दूर होतो. शरीराच्या उलट भागात याचा प्रभाव दिसायला लगेच सुरवात होते.
मुख्यत: दहा हस्त मुद्रा- हस्त मुद्रांमध्ये प्रमुख दहा हस्त मुद्रांचे महत्व आहे. १. ज्ञान मुद्रा, २. पृथ्वी मुद्रा, ३. वरुण मुद्रा, ४. वायु मुद्रा, ५. शुन्य मुद्रा ६. सूर्य मुद्रा, ७. प्राण मुद्रा, ८. अपान मुद्रा, ९. अपान वायु मुद्रा, १०. लिंग मुद्रा.
३. योग निद्रा : प्राणायाम मध्ये प्रत्येक दिवशी भ्रामरी आणि पाच मिनिटांचे ध्यान करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर वीस मिनिटांची योग्य निद्रा घ्यावी आणि दरम्यान रुचकर संगीत पूर्ण तन्मयतेने ऐका व त्याचा आनंद घ्या. जर प्रत्येक दिवशी तुम्ही योग निद्रा करतात तर हा रामबाण उपाय सिद्ध होतो. योग निद्रा आपल्याला केवळ शवासनच्या मुद्रा मध्ये झोपायचे आहे आणि आपल्या श्वासावर लक्ष्य द्यायचे आहे. तसेच संपुर्ण शरीराला पायपासून डोक्या पर्यंत क्रमाने एकदम हलके सोडून निवांत व्हायचे आहे.
४. ध्यान करणे : जर वरील दिलेल्या पैकी काहीच करू शकत नाही. तर प्रत्येक दिवशी १० मिनिट ध्यान करा. हे तुमच्या शरीरासोबत मन आणि मस्तिष्कला बदलवून देईल. जर तुम्ही याला योग्य रितीने केले तर हे हजार प्रकारच्या रोगांना कसे नष्ट करायचे हे जाणून आहे.
५. विरेचन क्रिया : यात शरीराला आत पर्यंत स्वच्छ केले जाते. आधुनिक युगात एनिमा लावून हे कार्य केले जाते. पण आयुर्वेद मध्ये नैसर्गिकरीत्या हे कार्य केले जाते.