Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी 8 योगा टिप्स

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी 8 योगा टिप्स
, मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (12:31 IST)
हिवाळ्याच्या काळात आरोग्यावर विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण आरोग्याशी निगडित त्रास थंड वातावरणातच सामान्य होतात. जसे डोकेदुखी,  कंबरदुखी, सर्दी-पडसं, हृदयाशी निगडित त्रास देखील होऊ शकतात. जर आपण नियमितपणे योगा कराल तर आपण या साऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहू शकता. जाणून घेऊ या काही आवश्यक टिप्स -
 
1 शरीराचे चलन होण्यासाठी पायाची बोटं, टाचा, गुडघा, मांडी, पोट, हातांचे बोटं, मनगट, कोपरा, खांदा, मान आणि डोळे प्रत्येक अवयवांचे संचलन 5 ते 10 वेळा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करणं फायदेशीर असणार.
 
2 सायको सोमॅटीक, न्यूरोसोमॅटीक, दमा सारख्या आजारामध्ये या यौगिक क्रिया करणे लाभदायी आहे. या सह शशांक आसन, योगमुद्रा, पवनमुक्तासन, भुजंगासन, स्ट्रेच मकरासन-2 फायदेशीर आहे.
 
3 काही शारीरिक आणि मानसिक आजार देखील ताण आणि चिंता मुळे होते. त्यांच्यावर मात करण्यासाठी योग क्रिया उत्तम आहेत. प्राणायाम आणि ध्यान करणे मानसिक समस्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
 
4 निरोगी लोकांसाठी देखील योग क्रिया फायदेशीर आहे. निरोगी लोक निरोगी राहावे, म्हणून योग तज्ञाच्या सल्ल्याने हे आसन करावे - ताडासन, त्रिकोणासन, उभारून कंबरेला पुढे-मागे, उजवीकडे-डावीकडे वाकविण्याची क्रिया 5 वेळा करावी.
 
5 सरळ झोपून अर्धहलासन, सायकलिंग, पवनमुक्तासन, सरळ नौकासन बसून पश्चिमोत्तासन, शशांकासन आणि योग मुद्रा करावे. पालथे झोपून भुजंगासन, सर्पासन, शलभासन, धनुरासन, नौकासन, रोलिंग नौकासन करावे.
 
6 प्राणायाम सर्वांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये योगेंद्र प्राणायाम, नाडीशोधन, प्राणायाम, भ्रमिका प्राणायाम, उज्जयी प्राणायाम अधिक फायदेशीर आहेत. ध्यान आपण आपल्या सामर्थ्यानुसार केले जाऊ शकतात. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ॐ चे उच्चारण देखील महत्त्वपूर्ण मानले आहे.
 
7 ध्यान, प्राणायाम, शवासन योगनिद्रा द्वारे सुप्त शक्ती जागृत करता येतात. या मुळे काम करण्याची शक्ती वाढते. मन एकाग्र होते, बुद्धी तीक्ष्ण होते. या कृतींमुळे शारीरिक आणि मानसिक रोगांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती वाढते.

8 थंडीच्या दिवसात उच्च रक्तदाब, हृदय रोग असलेल्या रुग्णांना रात्री जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला आणि योग तज्ञांच्या सल्ल्याचा फायदा होतो. प्रत्येकाने सकाळी-संध्याकाळी फिरायला जावे. दिवसातून एकदातरी हसायला पाहिजे. झोपण्याच्या 2 तासापूर्वी पचण्या योग्य अन्न खावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक