आजकाळच्या धावपळीच्या जीवनात माणसाची जीवनशैली देखील बदलली आहे. आपले आणि आपल्या कुटुंबियांचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी लोकं तणाव खाली जगत आहे. मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकाग्रतेची कमी होऊ लागली आहे. त्यामुळे गोष्टीना विसरणं हे प्रकार वाढतच जात आहे. विसरणं ही सामान्य बाब आहे. पण मग ते सामान विसरणं असो किंवा एखादी गोष्ट विसरणं असो. पण जर ही सामान्य बाब एकाद्या अडचणीला कारणीभूत ठरली, तर त्याला दूर करणं महत्वाचं आहे. त्याच समाधान करणं महत्वाचं आहे. दररोजचे योग केल्यानं या सारख्या समस्यांना दूर करण्यास मदत करतं. जर आपल्या मुलाचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा वाचलेले विसरत असेल तर त्याला देखील ही योगा करण्याची सवय लावा.
योगाचं महत्वपूर्ण आसन म्हणजेच हे बालासन. हे केल्यानं मेंदूशी निगडित सर्व त्रासांपासून सुटका होते. हे केल्यानं मेंदू तीक्ष्ण होतो. आणि मानसिक ताणासारखे त्रास देखील दूर होतात. चला तर मग आपण बालासन करण्याची पद्धत जाणून घेऊया.
बालासन करण्याची कृती -
हे आसन केल्यानं मेंदू आणि मन शांत राहतं, ज्यामुळे आपली मज्जासंस्था व्यवस्थितरीत्या काम करते आणि शांत राहते. हे करण्यासाठी सर्वप्रथम आपण वज्रासनाच्या अवस्थेत बसून घ्या. नंतर आपल्या डोक्याला जमिनीवर स्पर्श करावं. आपले दोन्ही हात जमिनीवर ठेवावे. आता आपल्या छातीने आपल्या मांडींवर दाब द्यावा.
बालासन करण्याचे फायदे -
* बालासन केल्यानं आपली मज्जासंस्था शांत राहते.
* बालासन केल्यानं बद्धकोष्ठतेच्या त्रासा पासून आराम मिळतो.
* बालासन पाठदुखीवर देखील फायदेशीर आहे.
* बालासन शरीराची ओढाताण आणि तणावाला दूर करतं.
* बालासनाच्या नियमित सरावानं चांगली झोप येते.
बालासन करण्याच्या दरम्यान घेतली जाणारी खबरदारी -
*आपल्या गुडघ्याची शल्यक्रिया झालेली असल्यास आपण हे आसन करू नये.
* अतिसाराने ग्रस्त असलेल्या माणसाने हे आसन करू नये.
* तसेच गरोदर असल्यास हे आसन करू नये.