नैराश्य म्हणजे जीवनाबद्दलची आसक्ती होणे, म्हणजे जगण्याबद्दलची नकारात्मक वृत्ती होणे. नैराश्य आल्यावर आनंद, यश शांती ,नाते संबंध ही निरर्थक ठरतात. जर ही स्थिती नैसर्गिक असेल तर समजून घेऊ शकतो. परंतु ही स्थिती कायम राहिली तर घातक असू शकते. या मुळे रोग निर्माण होतील. नैराश्यने ग्रसित व्यक्ती आयुष्यालाही नाकारू शकतो.
नैराश्य किंवा डिप्रेशनची कारणे वातावरण, परिस्थिती, आरोग्य , क्षमता, नाते संबंध किंवा काहीही घटना असू शकते. सुरुवातीला व्यक्ती स्वतःला कळत नाही, हळूहळू त्याच्या वागण्यात आणि स्वभावात बदल होतात. अति चिडचिडेपणा, रागीटपणा, नास्तिकता, अपराधीपणाचा बोध होतो. व्यक्तीला ड्रग्सचे व्यसन जडतात.
अशा परिस्थितीत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीला आंनदी वातावरण द्या. त्याला एकटे सोडू नका. त्याच्या आवडीनिवडी जोपासण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सभोवतालीचे वातावरण आनंदी आणि खेळी मेळीचे ठेवा.
नैराष्यावर प्राणायाम हे सर्व प्रकारच्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी आहे. या साठी डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला प्राणायाम करण्यासाठी प्रवूत्त करा.
या साठी त्याच्या कडून सर्वप्रथम पद्मासन करवून घ्या. नंतर प्राणायामाचे लहान आवर्तन करा. दीर्घ श्वास घेऊ द्या. असं केल्याने नैराश्य हळूहळू कमी होईल. मन शांत होईल.
नाडी शोधन प्राणायामानंतर उन्हाळ्यात 'शीतली ' आणि हिवाळ्यात 'मस्त्रिका' प्राणायाम करवून घ्या.
प्राणायामचे दोन आवर्तन केल्यावर ॐ चा उच्चार करण्यास सांगा. प्रथम ॐ दीर्घ करू द्या या मुळे आतील स्नायू कंपन झाल्यामुळे सहज होईल. नंतर ॐ चा लघु उच्चार करू द्या. या मुळे मस्तिष्क, ओठ, टाळू हे कंपन होऊन सहज होतात. ॐ चा नाद केल्यामुळे तणाव आणि नैराश्य हळू हळू कमी होऊ लागते. नंतर विश्रांती घ्या. आरामदायी झोप घ्या.
प्राणायामाचे परिणाम त्वरित दिसून येतात. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला प्राणायामाचा सराव दीर्घ काळासाठीसातत्याने करायला पाहिजे. हा योग एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरेल.