Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी हे योगासन करा

Yoga Asanas To Improve Digestive System
, मंगळवार, 11 मार्च 2025 (21:30 IST)
काही लोकांची पचनसंस्था कमकुवत असते. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चांगली पचनसंस्था शारीरिक आणि मानसिक दृष्टया निरोगी ठेवते. आपण जे काही खातो त्याने आपल्याला ऊर्जा आणि शक्ती मिळते.आपण जे काही खातो त्याचा फायदा शरीराला होतो. सध्या लोकांची जीवनशैली मुळे पचनसंस्थांची समस्या उदभवत आहे.
बाहेरचे अन्न खाऊन ,जंकफूड शरीराची पाचनसंस्था कमकुवत करते.त्यामुळे पोटफुगी, बद्धकोष्ठता गॅस होणे, मळमळ, अपच होणे सारखे त्रास होतात. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लोकांना औषधे घ्यावी लागतात पण त्याने तात्पुरती आराम मिळतो. नैसर्गिकरित्या या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काही योगासनांमुळे तुम्हाला पचनसंस्था मजबूत होण्यास खूप मदत होऊ शकते, अशा  योगासनांबद्दल येथे जाणून घ्या.  
नौकासन - 
पोटांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी नौकासन हे उत्तम आसन आहे. या आसनामुळे आतड्यांना शक्ती मिळते हे पाचक रसांचे स्त्राव देखील सुधारते. या योगासनांमुळे पचनशक्ती सुधारते.
 
वज्रासन 
पोटाचे त्रास दूर करण्यासाठी हा सर्वात चांगला योगासन आहे. हे योगासन जेवण झाल्यावर देखील करता येते. 
जेवण झाल्यावर 5 ते 10 मिनिट वज्रासन मध्ये बसावे. हे केल्याने पचन सुधारते. 
वज्रासनात बसल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो. 
भुजंगासन 
अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी भुजंगासन करणे चांगला पर्याय आहे. हे आसन करण्यासाठी 
जमिनीवर झोपा आणि शरीराला कोब्रा पोझ मध्ये वर करा. हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि अन्नाचे लवकर पचन होते. 
 
मलासन
हे आसन बद्धकोष्ठताचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हे योगासन नियमित केल्याने पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या योगासनामुळे चयापचय सुधारते. 
 
त्रिकोणासन
ज्यांना भूक कमी लागते त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास त्यावर उपचार करते. हे यकृत आणि आतड्यांसंबंधी मार्ग सक्रिय करते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामायणाची कथा : लक्ष्मणजी १४ वर्षे झोपले नाहीत