वृद्धांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.बऱ्याच वेळा वृद्ध लोक खूप हट्टी होतात आणि स्वतःची काळजी देखील घेत नाही. निष्काळजीपणा करतात. या साठी घरातील तरुणांनी त्यांची काळजी घ्यावी. जेणे करून ते निरोगी राहतील.सध्याच्या कोरोनाच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण स्वतःसह त्यांचा आरोग्याची काळजी घ्या. या साठी आपण त्यांच्या कडून काही सोपे आसनांचा सराव करून घ्या. जेणे करून त्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आसन त्यांच्या कडून करवून घ्यायचे आहे?
1 भुजंगासन -हे खूप सोपे आहे.म्हणून जर वृद्धांनी त्यांच्या क्षमतेनुसार या आसनाचा सराव केला तर त्यांना बराच फायदा होतो. भुजंगासन केल्याने छाती मोकळी होते आणि शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढवून पांढऱ्या पेशींना वाढवते. तसेच याचा सराव केल्याने पचन सुधारते.
2 सेतुबंधासन- आपल्या शरीरात टी-पेशी आढळतात.या पेशी रोगप्रतिकारक क्षमतेला वाढविण्यास आवश्यक असतात. शरीरात असलेल्या या टी -पेशी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात. या टी-पेशी पांढऱ्या रक्त पेशींचे प्रकार आहे.
3 अधोमुखश्वानासन-अधोमुखश्वानासन एक अशी मुद्रा आहे ज्याचा सराव केल्याने शरीरातील पांढर्या रक्त पेशी त्यांची जागा बदलतात. वृद्धांनी त्यांच्या क्षमतेनुसार या आसनाचा सराव केला पाहिजे. जर आपल्याला थोडा सर्दी असेल तर हे आसन सर्दी बरे करण्यास मदत करते, म्हणून आपल्या घरातील वडिलधाऱ्यांकडून नियमितपणे या आसनांचा सराव करावा.