दमा हा श्वसन रोगांपैकी एक गंभीर आजार आहे. या आजारा दरम्यान घसा आणि छातीवर खूप परिणाम होतो. जेव्हा दम्याचा त्रास होतो तेव्हा योग्य प्रमाणात ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यामुळे त्या व्यक्तीस श्वासोच्छवासाची समस्या येऊ लागते. या आजाराने ग्रस्त रुग्णांनी अनेक प्रकारच्या सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या आजारामध्ये काही योगासन केल्याने आराम मिळतो. चला तर मग जाणून घ्या कोणते आहे हे आसन.
पवन मुक्तासन
हे आसन केल्याने शरीरातील दूषित हवा बाहेर येते. याला पवन मुक्तासन असे म्हणतात. हे आसन करायला सोपे आहे. हे करण्यासाठी शवासन मध्ये झोपा नंतर पाय एकमेकांना जोडून घ्या. कंबरेवर हात ठेवा जमिनीवर पाऊले ठेवत गुडघ्यापासून पाय दुमडून घ्या. नंतर छातीवर दोन्ही गुडघे ठेवा. गुडघ्यांना हाताने कात्री करत धरून ठेवा. डोकं जमिनीवरुन उचलत श्वास बाहेर सोडत हनुवटी गुडघ्याला लावा. गुडघे हाताने सोयीनुसार दाबा.