Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

किशोर वयात उंची वाढविण्यासाठी हे प्रभावी योगासन करा

किशोर वयात उंची वाढविण्यासाठी हे प्रभावी योगासन करा
, सोमवार, 4 जानेवारी 2021 (11:32 IST)
पौगंडावस्था किंवा किशोरावस्था, जीवनातील ती अवस्था आहे जेव्हा माणसाचं शरीर तयार होतो. अशा परिस्थितीत बरेच बदल येतात. जसे की उंची वाढणे, वजन कमी जास्त होणं, आवाजात बदल होणं इत्यादी. अशा वेळी योगा करणे महत्त्वाचे आहे. योगा केल्याने शारीरिक बदल योग्य प्रकारे होतो. बऱ्याच मुलांची उंची या  पौंगंडावस्थेत वाढत नाही. ज्यामुळे त्यांचे पालक खूपच काळजीत असतात. बरेच लोक या साठी वेगवेगळे उपचार देखील करतात, पण खरंच का योगा केल्याने उंची चांगली वाढते. जाणून घ्या की कशा प्रकारे योगा केल्याने उंची वाढते.
 
1 पश्चिमोत्तानासन- 
उंची वाढविण्यासाठी पश्चिमोत्तानासन म्हणून फायदेशीर आहे कारण ह्याच्या  सरावामुळे शरीर ताणतो. हे करण्यासाठी पाय लांब करून बसावे. लक्षात ठेवा की पाय एकमेकांना जुडलेले असावे. हाताला पायाच्या अंगठ्या कडे घेऊन जाऊन पुढे वाका. 15 ते 30 सेकंद हे करण्याचे प्रयत्न करा. हे नियमितपणे करा आणि शक्य असल्यास डोकं गुडघ्या पर्यंत वाकवा. असं केल्याने शरीर चांगल्या प्रकारे ताणले जाते.  
 
2 हलासन - 
उंची वाढविण्यासाठी हलासन देखील चांगले पर्याय आहे. हलासन करण्यासाठी कंबरेवर झोपा आणि हाताला शरीराजवळ चिटकवून ठेवा. हळू-हळू पाय  वर उचला आणि 90 अंशाच्या कोणात आणा. श्वास सोडत पायांसह पाठ देखील वर उचला आणि पाय मागे नेत अंगठ्याला जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढ्या वेळ याच आसनात राहा आणि नंतर सामान्य परिस्थितीत या आणि विश्रांती घ्या.
 
3 सर्वांगासन -
 हे आसन केल्याने उंची खूप झपाट्याने वाढते. या आसनाचे वैशिष्ट्ये आहे की हे केल्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. जेव्हा सर्व अवयव योग्य प्रकारे व्यायाम करतात तेव्हा उंची संतुलनासह वाढते. हे करण्यासाठी पाठीवर झोपा आणि पायाला 90 कोणाच्या अंशाने सरळ करा. आता शरीराला कंबरेवर हाताचा आधार देऊन वर उचला. शरीराचे संतुलन झाल्यावर हात जमिनीवर ठेवा.
 
4 भुजंगासन -
पौगंडावस्थामध्ये तर भुजंगासन करावे. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर पालथे पडून टाचा आणि पंजे मिळवा. लक्षात ठेवा की कोपरे कंबरेला जुडलेले असावे आणि तळहात वर असावे. हाताला कोपऱ्यापासून वळवून हळू-हळू आणा आणि तळहात बाह्यांखाली ठेवा नाक जमिनीवर स्पर्श करवून डोकं आकाशाकडे उचला. 15 ते 20 सेकंद असेच ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MPPEB एमपी पोलीस कॉन्स्टेबल भरती 8 जानेवारी पासून सुरू, अर्ज करा