Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Parvatasana yoga :पर्वतासन योगामुळे हात आणि पायांच्या स्नायूंसह सांधे मजबूत होतात, जाणून घ्या इतर फायदे

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (21:55 IST)
Parvatasana yoga Benefites :उत्तम आरोग्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या शारीरिक-मानसिक आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यासाठी, तज्ञ सर्व लोकांना त्यांच्या नियमित दिनचर्यामध्ये योग आसनांचा समावेश करण्याची शिफारस करतात.योगाभ्यासाने शारीरिक निष्क्रियता दूर करणे, रक्ताभिसरण वाढवणे, स्नायूंचा कडकपणा आणि मज्जातंतूंशी संबंधित विकार दूर होऊन अनेक फायदे मिळतात. योग तज्ज्ञांच्या मते, पर्वतासन योगाचा नियमित सराव करण्याची सवय सर्व वयोगटातील लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. या आसनामुळे सांध्याच्या समस्या दूर होतात, स्नायू लवचिक होतात आणि हात पाय मजबूत होतात.चला जाणून घेऊया पर्वतासन योगाचे फायदे.
 
पर्वतासन योग कसा करावा -
पर्वतासन योगाची सवय सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. या योगासाठी सर्वप्रथम वज्रासनाच्या आसनात बसावे.आता दोन्ही हातांची आणि पायाची बोटे हळूहळू जमिनीवर ठेवा. त्रिकोणी आकारात कंबर शक्य तितकी वर खेचा.आसन करताना तुमच्या शरीराचा आकार डोंगर उभा असल्यासारखा दिसायला हवा. दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि काही काळ या स्थितीत रहा. त्यानंतर पूर्ववत स्थितीत परत या.
 
पर्वतासन योगाचे फायदे-
पर्वतासन योगाचे सराव केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. योग तज्ञ नियमितपणे त्याचा सराव करण्याची शिफारस करतात.
* हे योगासन केल्याने  सेक्रल चक्र सक्रिय होण्यास मदत करते.
* मणक्याला लवचिक बनवून शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
* मज्जासंस्थेला आराम आणि मन शांत ठेवण्यात या योगाचे फायदे आहेत.
* हे शरीराच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करते. 
* या योगाच्या सरावाने पोटाच्या अवयवांचे पोषण होते, ज्यामुळे पचनाचे विकार दूर होतात.

Edited By -Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

लसूण कढी रेसिपी

Kadha for Dengue Patients :डेंग्यूवर रामबाण काढा घरीच बनवा

एमबीए कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

Beauty Tips : त्वचेच्या टॅनिंगला या दोन घरगुती वस्तूने दूर करा

शस्त्रक्रियेशिवाय मानेचे कुबडे काढा, हे नैसर्गिक उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments