Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

हे 3 व्यायाम नियमितपणे केल्यानं शरीराचे पोश्चर सुधारेल

हे 3 व्यायाम नियमितपणे केल्यानं शरीराचे पोश्चर सुधारेल
, बुधवार, 9 डिसेंबर 2020 (13:58 IST)
आपले पोश्चर योग्य असणे खूप महत्त्वाचे असते. चुकीचे पोश्चर आपल्या शरीराची संपूर्ण रचना खराब तर करतेच तर ह्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर देखील पडतो. जर आपण वाकून चालता तर आपला खांदा वाकलेला असतो हे पोश्चर चुकीचे आहे. खांद्यांना जास्त काळ वाकवून काम केल्यानं कुबड निघण्याची समस्या देखील उद्भवते. चुकीच्या पोश्चरला सुधारण्यासाठी योग्य वेळी या वर काम करणे आवश्यक आहे, नाही तर शरीरात वेदना आणि स्नायूंवर जास्त दाब पडतो. जर आपल्याला उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व मिळवायचे असल्यास आम्ही आपल्याला काही व्यायाम सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण चांगले पोश्चर मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 डोर फ्रेम स्ट्रेच : हे व्यायाम करण्यासाठी आपण आपल्या दारा जवळ उभे राहा. दोन्ही हातांना आपल्या दाराच्या कोपऱ्यात 90 अंशाच्या कोनात ठेवा. आपल्या हातांना स्थिर ठेवून हळू-हळू पुढे जा. लक्षात ठेवा की आपल्याला खाली बघायचे नाही. समोर बघून मागे-पुढे व्हा. असं आपल्याला नियमितपणे करायचे आहे. हे व्यायाम केल्यानं आपल्या खांद्यात एक ताण जाणवेल, जे आपल्या गोल खांद्याला सुधारण्यास मदत करेल.
 
2 धनुरासन : या साठी आपण पोटावर झोपा आणि छातीला वर उचलून हातांना मागील बाजूस न्या. पायांना देखील कुल्ह्याकडून वर उचला आणि पायाच्या पंज्यांना हाताने धरा आणि काही काळ अशाच स्थितीमध्ये राहा. या आसनाच्या साहाय्याने आपण आपल्या पोश्चरला सुधारू शकता. 
 
3 मार्जरासन : हे व्यायाम पोश्चरला सुधारण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपण हातावर आणि गुडघ्यावर यावे आणि हाताला सरळ ठेवावे. श्वास सोडत डोक्याला छातीकडे न्यावे आणि वरच्या कंबरेला बाहेरच्या भागाने गोल करा. असं केल्यानं आपल्या पाठीत ताण येईल. आपण हे आसन करण्यापूर्वी योग तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गॅझेटस्‌ची साफसफाई आणि सुरक्षा